नागपुरात सोने पुन्हा ३१,५०० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:06 AM2018-09-14T01:06:46+5:302018-09-14T01:07:26+5:30
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण आणि इंधनाच्या वाढत्या भावाचा परिणाम देशांतर्गत सोन्याच्या किमतीवर पडला आहे. २५ दिवसांत सोन्याच्या भावात तब्बल १३०० रुपयांची वाढ होऊन सणासुदीत भाव गुरुवारी ३१,५०० रुपयांवर पोहोचले आहे. भाववाढीमुळे सराफा बाजारात अस्थिरता आहे. ग्राहक भाव कमी होण्याची वाट पाहात असले तरीही पुढे भाव कमी होण्याची शक्यता नसल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण आणि इंधनाच्या वाढत्या भावाचा परिणाम देशांतर्गत सोन्याच्या किमतीवर पडला आहे. २५ दिवसांत सोन्याच्या भावात तब्बल १३०० रुपयांची वाढ होऊन सणासुदीत भाव गुरुवारी ३१,५०० रुपयांवर पोहोचले आहे. भाववाढीमुळे सराफा बाजारात अस्थिरता आहे. ग्राहक भाव कमी होण्याची वाट पाहात असले तरीही पुढे भाव कमी होण्याची शक्यता नसल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले.
दसºयाच्या मुहूर्तावर २४ कॅरेट सोन्याचे भाव ३२,५०० रुपयांवर जाण्याचा अंदाज सराफा वर्तवित आहेत. एक महिन्यांच्यापूर्वी सोने ३० हजारांवर होते तेव्हा बाजारात ग्राहकांची खरेदी वाढली होती. पण भाव वाढताच कमी होण्याच्या अपेक्षेने ग्राहकांनी खरेदी थांबविली. पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी पाहता सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता नाही. उलट दसरा, दिवाळीत भाव पुन्हा उच्चांकावर जाण्याची शक्यता इतवारी सोने-चांदी ओळ कमेटीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांचे अवमूल्यन झाल्यास सोन्यात वाढ होते. पण जुलै आणि आॅगस्ट महिना अपवाद ठरला. त्यावेळी अमेरिकेत सोन्याला मागणी कमी असल्यामुळे रुपयांचे अवमूल्यन झाल्यानंतरही सोन्यात घसरण होऊन भाव ३० हजारांच्या खाली आले होते. त्यानंतर अमेरिकन बाजारात उलाढाल वाढल्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा वाढले. आता डॉलरचे मूल्य वाढल्यामुळे सोन्याचे भाव निरंतर वाढत आहे. यंदाच्या सणासुदीत भारतीय बाजारात ग्राहकांना सोने जास्त भावातच खरेदी करावे लागेल, असे कावळे यांनी स्पष्ट केले.
उन्हाळ्यात लग्नसराईत सोन्याने ३० हजारांचा पल्ला गाठला. त्यानंतर भावात घसरण होऊन १७ आॅगस्ट रोजी सोने ३० हजारांच्या खाली आले. ९ सप्टेंबरला भाव २९,९०० रुपये होते.
चांदीला अचानक मागणी, गुंतवणुकीची संधी
सध्या चांदीचे भाव निच्चांकावर आले आहे. यंदा गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणानिमित्त चांदीची मागणी अचानक वाढली आहे. गुरुवारी भाव प्रति किलो ३८,७०० रुपयांपर्यंत खाली आले. त्यामुळेच चांदीचे भाडे, ग्लास, वाट्या आणि अन्य वस्तूंची खरेदी वाढली आहे. मागणी आणि पुरवठ्यात तफावत असल्यामुळे ग्राहकांना हव्या त्या वस्तू मिळत नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी महालक्ष्मी सणासाठी आॅर्डर देणे सुरू केले आहे. दसरा आणि दिवाळीत चांदीचे भाव ४२ हजारांवर जाण्याची शक्यता कावळे यांनी व्यक्त केली आहे. भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांनाही चांदीत गुंतवणुकीची उत्तम संधी मिळाली आहे.
का होतेय सोन्यात घसरण?
डॉलरचे मूल्य वाढत असल्याने सोन्याचेही भाव वाढणे अपेक्षित होते. मात्र अमेरिकन सुवर्ण बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोन्याचे भाव ४५ प्रति डॉलरने कमी झाले आहे. गेल्या आठवड्यात १२२० डॉलर (भारतीय मूल्य ८६ हजार ९४० रुपये) प्रति अंस असलेले सोने या आठवड्यात ११७५ डॉलरवर आले आहे. त्यामुळे भारतातही सोन्याच्या भावात घसरण होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. (अमेरिकेत प्रती तोळ््या ऐवजी प्रती अंस सोने मोजले जाते. एक अंस म्हणजे २८.३४ ग्रॅम सोने)
या सोबतच सध्या सोने-चांदीला मागणी कमी असल्याने सोन्याचे भाव कमी होण्यास मदत मिळत आहे.