दीक्षाभूमीला ४०, तर ड्रॅगन पॅलेसला १५ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:58 AM2018-04-01T00:58:02+5:302018-04-01T00:58:17+5:30

प्रसिद्ध दीक्षाभूमी व कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास व्हावा, यादृष्टीने दीक्षाभूमीला ४० कोटी तर ड्रॅगन पॅलेस टेम्पलला १५ कोटी रु. निधीचा पहिला हप्ता शासनाने उपलब्ध करून दिला असून, रात्री उशिरा या निर्णयाचे शासकीय परिपत्रक जारी करण्यात आले.

Rs 40 crore to Diksabhoomi and Rs 15 crores to Dragon Palace | दीक्षाभूमीला ४०, तर ड्रॅगन पॅलेसला १५ कोटींचा निधी

दीक्षाभूमीला ४०, तर ड्रॅगन पॅलेसला १५ कोटींचा निधी

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका : १०० कोटीपैकी पहिला हप्ता जारी


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रसिद्ध दीक्षाभूमी व कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास व्हावा, यादृष्टीने दीक्षाभूमीला ४० कोटी तर ड्रॅगन पॅलेस टेम्पलला १५ कोटी रु. निधीचा पहिला हप्ता शासनाने उपलब्ध करून दिला असून, रात्री उशिरा या निर्णयाचे शासकीय परिपत्रक जारी करण्यात आले.
गेल्या २७ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शासनाच्या शिखर समितीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत १०० कोटी रुपये दीक्षाभूमी व २५ कोटी रुपये ड्रॅगन पॅलेस टेम्पलला विविध विकास कामांना देण्यास तत्त्वत: मंजुरी दिली होती. या बैठकीला तीन दिवसाचा कालावधी उलटून जात नाही तोच चौथ्या दिवशी शासनाने या बौद्ध समाजाच्या पवित्र स्थानाबद्दल सकारात्मक भूमिका घेऊन निधीचा पहिला टप्पा देण्यास मान्यता दिली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व शहरातील आणि जिल्ह्यातील भाजपा आमदारांनी या निधीसाठी प्रयत्न केले, हे उल्लेखनीय.
या निधीमध्ये ९० टक्के हिस्सा शासनाचा व १० टक्के हिस्सा संबंधित संस्थेचा आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ही या कामाची नोडल एजन्सी आहे. दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस या दोन्ही धार्मिक स्थळांवर वर्षभर लाखो अनुयायी दर्शनासाठी येत असतात. या दोन्ही ठिकाणी येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून विकास कामे व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दीक्षाभूमीचा १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तर ड्रॅगन पॅलेसच्या २५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तत्कालीन शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. निधीच्या उपलब्धतेनुसार या दोन्ही स्थळांच्या विकासासाठी निधी देण्यात येणार आहे. राज्य शासनाने या दोन्ही संस्थांना निधी उपलब्ध करून देण्याचा सकारात्मक निर्णय घेऊन अनेक वर्षांपासूनची बौद्धबांधवांची मागणी पूर्ण केली आहे.

Web Title: Rs 40 crore to Diksabhoomi and Rs 15 crores to Dragon Palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.