गारपीटग्रस्तांच्या खात्यात ९१ कोटी रुपये जमा

By admin | Published: May 5, 2014 10:19 PM2014-05-05T22:19:02+5:302014-05-06T17:21:59+5:30

निवडणुका, आचारसंहितेच्या धावपळीत महसूल प्रशासनाने नागपूर विभागातील १ लाख २३६९ गारपीटग्रस्तांच्या खात्यात एकूण ९१ कोटी रुपये जमा केले आहेत.

Rs.91 crore deposit in the account of hailstorms | गारपीटग्रस्तांच्या खात्यात ९१ कोटी रुपये जमा

गारपीटग्रस्तांच्या खात्यात ९१ कोटी रुपये जमा

Next

नागपूर : निवडणुका, आचारसंहितेच्या धावपळीत महसूल प्रशासनाने नागपूर विभागातील १ लाख २३६९ गारपीटग्रस्तांच्या खात्यात एकूण ९१ कोटी रुपये जमा केले आहेत. नागपूर जिल्ह्यातील ५५ हजार ८१३ शेतकर्‍यांना ६५ कोटी ७४ लाख रुपये वाटप करण्यात आले आहे.
ऐन निवडणुकांच्या तोंडावर म्हणजे फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार ५८ शेतकर्‍यांच्या पिकांची हानी झाली होती. त्यात नागपूर जिल्ह्यातील १ लाख ५० हजार १२२ शेतकर्‍यांचा समावेश होता. सरकारने तातडीने पॅकेज जाहीर केले. पण आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात निवडणुकीच्या कामात यंत्रणा व्यस्त झाली. मात्र याही काळात मदत वाटप संथ होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांना दिल्या होत्या. गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी ५ मेपर्यंत ९१ कोटी ५६ लाख रुपयांचे वाटप झाले आहे.
नागपूर जिल्ह्यातील ५५ हजार ८१३ शेतकर्‍यांच्या खात्यात एकूण ६५कोटी ७४ लाख रुपये जमा करण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील १५ हजार ७१९ शेतकर्‍यांना १२ कोटी ५७ लाख २० हजार, भंडारा जिल्ह्यातील ७१२७ शेतकर्‍यांना ५ कोटी २७ लाख, गोंदिया जिल्ह्यातील १३,०३९ शेतकर्‍याना ४ कोटी ६० लाख, चंद्रपूर जिल्ह्यातील १०,३९७ शेतकर्‍यांना ३ कोटी १६ लाख आणि गडचिरोली जिल्ह्यातील ३७४ शेतकर्‍यांना ३४ लाखाचे वाटप करण्यात आले आहे.
मदत वाटपाचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे. शासनाकडून निधी प्राप्त करण्यासाठी पाठपुरावाही सुरू आहे. शिल्लक निधी लवकरच प्राप्त होईल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
गारपीटग्रस्तांना मदत वाटप
जिल्हा शेतकरी रक्कम (कोटी)
नागपूर ५५,८१३ ६५.७४
वर्धा १५,७१९ १२.५७
भंडारा ७,१२७ ५.१७
गोंदिया १३,०३९ ४.६०
चंद्रपूर १०,३९७ ३.१६
गडचिरोली २७४ ०.३४

Web Title: Rs.91 crore deposit in the account of hailstorms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.