‘आरएसएस’ला नागपुरातूनच शह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:08 AM2017-09-09T01:08:54+5:302017-09-09T01:09:09+5:30

देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी संस्था म्हणून ओळखल्या जाणाºया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातूनच आव्हान मिळाले आहे.

 'RSS' from Nagpur | ‘आरएसएस’ला नागपुरातूनच शह

‘आरएसएस’ला नागपुरातूनच शह

Next
ठळक मुद्दे जनार्दन मून राष्ट्रीय अध्यक्षपदी : राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी संस्था म्हणून ओळखल्या जाणाºया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातूनच आव्हान मिळाले आहे. शुक्रवारी नागपुरात नव्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जाहीर निर्मिती करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्षांसह १३ जणांंची राष्ट्रीय कार्यकारिणीसुद्धा घोषित केली.
माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी शुक्रवारी संविधान चौकात नवीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाहीर केला आहे. या संघाची स्थापना त्यांनी गेल्या ९ आॅगस्ट रोजीच केली होती. मून यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवारी संविधान चौकात नव्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांसह १३ जणांचा समावेश आहे. तत्पूर्वी सर्व पदाधिकाºयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर नवीन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला.
नोंदणीसाठी आता १४ ला सुनावणी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नवीन संघाच्या नोंदणीसाठी जनार्दन मून यांनी रीतसर धर्मादाय आयुक्त कार्यालयाला अर्ज केलेला आहे. नोंदणीसाठी ८ सप्टेंबरला सुनावणी होणार होती. परंतु अधिकारी बैठकीसाठी मुंबईला गेले असल्याने सुनावणी होऊ शकली नाही. आता १४ तारखेला यावर सुनावणी होणार आहे.
१९२५ चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बेकायदेशीर
जनार्दन मून यांनी सांगितले की, १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन करण्यात आला. तेव्हा इंग्रजांचे सरकार होते. त्यामुळे त्यांनी तेव्हा संघाची अधिकृत नोंदणी केलेली नसावी. परंतु स्वातंत्र्यानंतर तरी संघटना ही कायदेशीर नोंदणीकृत व्हायला हवी होती. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे १९२५ चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा बेकायदेशीर आहे. त्यांनी अवैधपणे कामे केली त्यावर अंकुश लावणे व कायदेशीरपणे काम करणे हेच आपल्या संघाचे ध्येय आहे.
अशी आहे नव्या आरएसएसची कार्यकारिणी
राष्ट्रीय अध्यक्ष - जनार्दन मून
उपाध्यक्ष - चंद्रभान कोलते,
किरणकुमार पाली
सहसचिव - गणेश मधुरे
कोषाध्यक्ष - अनिल सहारे
सदस्य - ब्रिजलाल गंगवनी, समेउद्दीन मो. अली, अब्दुल नईम खान, रवींद्र डोंगरे, निकेश ठवरे, अ‍ॅड. आकाश कांबळे, आनंद वर्मा, प्रमोद चिंचखेडे

Web Title:  'RSS' from Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.