RSS headquarters in Delhi : दिल्लीतील संघ कार्यालयात ‘सीआयएसएफ’ची सुरक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2022 12:55 IST2022-09-06T12:48:19+5:302022-09-06T12:55:42+5:30
आयबीच्या अहवालानंतर गृह मंत्रालयाने हे पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

RSS headquarters in Delhi : दिल्लीतील संघ कार्यालयात ‘सीआयएसएफ’ची सुरक्षा
नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील मुख्यालयाच्या धर्तीवर दिल्लीतील कार्यालयाची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली असून ‘सीआयएसएफ’कडे सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी देण्यात आली आहे. सुमारे ७० जवानांचा तेथे पहारा राहणार आहे. आयबीच्या अहवालानंतर गृह मंत्रालयाने हे पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना अगोदरपासूनच ‘झेड प्लस’ सुरक्षा असून संघ मुख्यालयतदेखील ‘सीआयएसएफ’चे जवान तैनात आहेत. २०१५ पासून ही सुरक्षाव्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. आता दिल्ली कार्यालयालादेखील अशीच कडेकोट सुरक्षाव्यवस्था असेल. नेमका कोणता धोका असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. याबाबत गृह मंत्रालयाने कोणतीही माहिती जारी केलेली नाही.
सुरक्षेच्या दृष्टीने संघ मुख्यालय नेहमीच संवेदनशील राहिले आहे. नागपुरात २००६ साली दहशतवाद्यांनी संघ मुख्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला होता व पोलिसांच्या तत्परतेमुळे ते मारले गेले होते. याशिवाय केरळमध्येदेखील संघाच्या स्थानिक कार्यालयांवर हल्ले करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या.