संघाचा उद्या विजयादशमी उत्सव, अझीम प्रेमजी यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:21 AM2019-10-07T04:21:27+5:302019-10-07T04:23:02+5:30

बुद्ध, मुस्लीम, जैन, शीख इत्यादी धर्माचे व पंथांचे धर्मगुरू या उत्सवात सहभागी होत आले आहेत.

The RSS will celebrate to vijayadashami | संघाचा उद्या विजयादशमी उत्सव, अझीम प्रेमजी यांची भेट

संघाचा उद्या विजयादशमी उत्सव, अझीम प्रेमजी यांची भेट

Next

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ््याचे आयोजन मंगळवारी सकाळी रेशीमबाग मैदान येथे करण्यात आले आहे. यंदा या सोहळ्याला ‘एचसीएल’चे संस्थापक व अध्यक्ष शिव नाडर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी ७.४० पासून होणाऱ्या या कार्यक्रमाला सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील.

लोकसभा निवडणुकांत भाजपला मिळालेले यश, महाराष्ट्रासह दोन राज्यांतील विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर या सोहळ््याला महत्त्व आले आहे. देशातील वर्तमान सामाजिक व आर्थिक स्थिती, पाकिस्तानच्या कुरापती, केंद्र शासनाची कामगिरी, सामाजिक समरसता, आरक्षणाचा मुद्दा, ग्रामविकास, दुर्गम क्षेत्रांचे मागासलेपण, संघ-शासन-समाजाचा समन्वय इत्यादींसंदर्भात डॉ.भागवत मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे संघाचा विजयादशमी उत्सव हा सामाजिक समरसतेचा उत्सव मानण्यात येतो.

बुद्ध, मुस्लीम, जैन, शीख इत्यादी धर्माचे व पंथांचे धर्मगुरू या उत्सवात सहभागी होत आले आहेत. लोकसभा निवडणुकांत भाजपला विजय मिळाल्यानंतरचा हा पहिला विजयादशमी उत्सव आहे. सोबतच शाखांची वाढलेली संख्या, संघाचा वाढता दबदबा, चीन व पाकविरोधातील केंद्र शासनाचे कडक धोरण यामुळे यंदादेखील यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सोहळ््याचे ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार आहे.

अझीम प्रेमजी यांची भेट
प्रसिद्ध उद्योजक अझीम प्रेमजी यांनी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यांनी डॉ. भागवत यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली, शिवाय त्यांनी रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

Web Title: The RSS will celebrate to vijayadashami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.