आरटीई प्रवेशाला पुन्हा २३ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:06 AM2021-07-11T04:06:51+5:302021-07-11T04:06:51+5:30

नागपूर : आरटीईची प्रवेशप्रक्रिया महिनाभरापासून सुरू आहे. मात्र आतापर्यंत केवळ ६५ टक्के प्रवेश झाल्याने पुन्हा २३ जुलैपर्यंत प्रवेशास मुदतवाढ ...

RTE admission extended again till July 23 | आरटीई प्रवेशाला पुन्हा २३ जुलैपर्यंत मुदतवाढ

आरटीई प्रवेशाला पुन्हा २३ जुलैपर्यंत मुदतवाढ

googlenewsNext

नागपूर : आरटीईची प्रवेशप्रक्रिया महिनाभरापासून सुरू आहे. मात्र आतापर्यंत केवळ ६५ टक्के प्रवेश झाल्याने पुन्हा २३ जुलैपर्यंत प्रवेशास मुदतवाढ दिली. विशेष म्हणजे यापूर्वी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती, नंतर ती ९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली होती.

दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत (आरटीई) खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे बालकांची प्रवेशप्रक्रिया विलंबाने सुरू झाली. आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शिवाय शासनानेही निर्बंध शिथिल केले आहे. त्यामुळे निवड झालेल्या बालकांची प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू झाली. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची गती मंद असल्याने ९ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतरही ६५ टक्केच प्रवेश झाल्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

Web Title: RTE admission extended again till July 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.