आरटीई प्रवेश प्रक्रिया स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:07 AM2021-05-20T04:07:29+5:302021-05-20T04:07:29+5:30

नागपूर : आरटीई अंतर्गत २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. शिक्षण ...

RTE admission process postponed | आरटीई प्रवेश प्रक्रिया स्थगित

आरटीई प्रवेश प्रक्रिया स्थगित

Next

नागपूर : आरटीई अंतर्गत २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांसदर्भात पत्र काढून सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना कळविले आहे. आरटीईच्या लॉटरीमध्ये ५६११ बालकांची निवड झाली होती. प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

निवड झालेल्या बालकांची यादी पोर्टलवर जाहीर झाली असून, पालकांच्या मोबाईलवर एसएमएसही पाठविले आहे. निवड झालेल्यांच्या बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्या संदर्भातही पोर्टलवर तारीख दिलेली होती. परंतु, लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने प्रवेश प्रक्रिया अडचणीत आली. त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनी पुढील आदेश येईपर्यंत आरटीईच्या प्रक्रियेला स्थगिती दिली. जिल्ह्यातील ६८० शाळांनी नोंदणी केली असून, ५ हजार ७२९ जागा आरक्षित आहे. त्यासाठी २४ हजार १६८ पालकांनी अर्ज भरले होते.

शाळा बंद असल्यामुळे आरटीईची प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी नागपुरातील आरटीई फाऊंडेशन या संस्थेने केली होती. संस्थेने आरटीईच्या निधी वाटपाबाबत असलेला संभ्रम दूर करावा, सोबतच चौकशी करण्याची मागणी केली आहे. स्थगिती उठविण्यापूर्वी निधीचे नियोजन करावे, अशीही मागणी केली आहे. पुस्तक व गणवेश बद्दल धोरण स्पष्ट करावे, आदी मागणी केली आहे. संपूर्ण रक्कम जोपर्यंत शासन शाळांना देत नाही, तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. सचिन काळबांडे, उपाध्यक्ष राम वंजारी, सचिव अर्चना ढबाले, अनुप शाह, रमेश शेंडे, विकेश शुक्ला, अम्बरीश दुबे, मुकेश अग्रवाल, आदींनी केली आहे.

Web Title: RTE admission process postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.