आरटीई प्रवेश; नागपुरातील मुलीला १०० किमी दूरची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:38 AM2019-09-11T11:38:29+5:302019-09-11T11:39:06+5:30

आरटीईच्या चौथ्या ड्रॉमध्ये एका मुलीला तिच्या घरापासून १०० किलोमीटर दूरची शाळा मिळाली आहे. गुगल मॅपिंगनुसार नागपुरात राहणारी मुलगी शिकण्यासाठी १०० किलोमीटर दूर अंतरावर नरखेडला जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

RTE ; Nagpur girl's school is 100 km away | आरटीई प्रवेश; नागपुरातील मुलीला १०० किमी दूरची शाळा

आरटीई प्रवेश; नागपुरातील मुलीला १०० किमी दूरची शाळा

Next
ठळक मुद्देशिक्षण विभागावर संताप

आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना त्याच्या निवासस्थानापासून जवळ असलेल्या शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. नियमानुसार ३ किलोमीटरच्या आत प्रवेश देणे अनिवार्य आहे. परंतु आरटीईच्या चौथ्या ड्रॉमध्ये एका मुलीला तिच्या घरापासून १०० किलोमीटर दूरची शाळा मिळाली आहे. गुगल मॅपिंगनुसार नागपुरात राहणारी मुलगी शिकण्यासाठी १०० किलोमीटर दूर अंतरावर नरखेडला जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
आरटीईच्या प्रक्रियेत निवड झालेली ही लाभार्थी ५ वर्षाची असून, तिची निवड नरखेड तालुक्यातील खैरगावच्या शाळेत झाली आहे. सोमवारी आरटीईच्या चौथ्या फेरीचा ड्रॉ घोषित करण्यात आला. यात नागपूर जिल्ह्यातील ५६५ बालकांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या मुलांना शाळाही देण्यात आल्या. बालकांच्या पालकांना एसएमएस पाठवून आरटीईच्या वेबसाईटवरून निवड पत्र डाऊनलोड करण्यास सांगितले. ‘लोकमत’ कडे एका पाच वर्षाच्या बालिकेची निवड झाल्याचे पत्र मिळाले.
या पत्रात स्पष्ट लिहिले आहे की, मुलीच्या पालकाने अर्ज करताना गुगल मॅपिंगमध्ये सिव्हील लाईनचा पत्ता दिला आहे. नियमानुसार लाभार्थ्याला तीन किलोमीटरच्या आत शाळा उपलब्ध करून द्यायची आहे. परंतु या मुलीची नरखेड तालुक्यातील खैरगाव येथील संभाजी किड्स प्रायमरी अ‍ॅण्ड हायर प्रायमरी इंग्लिश स्कूलसाठी निवड झाली. यासंदर्भात चौकशी केल्यावर प्रवेश प्रक्रियेत कुठेतरी बोगसगिरी झाल्याचे निदर्शनास येते. आरटीईत अर्ज करताना गुगल मॅपिंग करणे आवश्यक आहे. त्या आधारेच तीन किलोमीटरच्या आत लाभार्थ्यांची निवड केली जाते. परंतु या मुलीची १०० किलोमीटर दूर निवड झाल्याने विभाग सुद्धा गोंधळात आहे.
अधिकाऱ्यांकडून चुप्पी
या प्रकरणात शिक्षण विभागात आरटीईच्या प्रक्रियेशी जुळलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यावर त्यांच्याकडून कुठलेही उत्तर मिळाले नाही. पण काही अधिकाºयांनी सांगितले की, मुलीचे घर नरखेडमध्ये असल्याने तिची निवड झाली असेल. मात्र गुगल मॅपच्या पत्त्याची माहिती दिल्यावर त्यांनीही चुप्पी साधली.
चौकशी करू
यासंदर्भात प्राथमिक शिक्षण अधिकारी चिंतामण वंजारी यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यापूर्वी प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.

Web Title: RTE ; Nagpur girl's school is 100 km away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा