नागपूर जिल्ह्यात तीन दिवसात आरटीईचे १० हजारावर अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 09:09 PM2019-03-09T21:09:50+5:302019-03-09T21:11:03+5:30

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पालकांच्या मुलांना ‘आरटीई’अंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश घेता येते. त्यामुळे पालकांचा आरटीईच्या प्रवेशाकडे चांगलाच कल असतो. ५ मार्च रोजी सायंकाळी ऑनलाईन अर्ज भरण्याला सुरुवात झाली. तीन दिवसात १० हजार पालकांनी अर्ज भरले आहेत.

RTI application for 10 thousand in Nagpur district in three days | नागपूर जिल्ह्यात तीन दिवसात आरटीईचे १० हजारावर अर्ज

नागपूर जिल्ह्यात तीन दिवसात आरटीईचे १० हजारावर अर्ज

Next
ठळक मुद्देपालकांच्या मार्गदर्शनासाठी ११२ केंद्रे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पालकांच्या मुलांना ‘आरटीई’अंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश घेता येते. त्यामुळे पालकांचा आरटीईच्या प्रवेशाकडे चांगलाच कल असतो. ५ मार्च रोजी सायंकाळी ऑनलाईन अर्ज भरण्याला सुरुवात झाली. तीन दिवसात १० हजार पालकांनी अर्ज भरले आहेत.
नागपूर जिल्ह्यात आरटीई अंतर्गत ६७५ शाळांची नोंद झाली असून, ७१९२ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन अर्ज भरताना संकेतस्थळाचे सर्व्हर स्लो असल्यासोबतच अनेक तांत्रिक अडचणीं येत आहे. तरीसुद्धा पालकांचा प्रतिसाद भरपूर मिळतो आहे. पालकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षण विभागाने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ११२ केंद्रे सुरू केली आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी यशवंत स्टेडियममध्ये केंद्र सुरू केले आहे. याशिवाय घरबसल्या अर्ज करण्यासाठी आरटीईचा अ‍ॅप तयार केला आहे. त्याद्वारेही १४ पालकांनी अर्ज भरले आहे.
सधन पालकांचाही आरटीईकडे कल
आरटीईचा लाभ हा केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना व्हावा, हा उद्देश आहे. त्यासाठी एक लाखाच्या आत वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठेवली आहे. एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेलेही आरटीईमध्ये नशीब आजमावत आहे. तहसीलदारांकडून एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला तयार करून आरटीईचे अर्ज भरत आहे.
खोटी माहिती दिल्यास अर्ज रद्द होतील
आरटीईच्या प्रवेशासाठी उत्पन्न हा महत्त्वाचा निकष आहे. उत्पन्नाचे खोटे दाखले दिले असले तरी, अर्जाची छाननी करताना उत्पन्न जास्त आढळल्यास त्यांचे अर्ज रद्द होणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली .
नंदनवनच्या विद्यार्थ्याला तेलंगखेडीची शाळा
आरटीईच्या नियमानुसार तीन किलोमिटरच्या आत विद्यार्थ्यांना शाळा मिळणे गरजेचे आहे. पण ऑनलाईन अर्ज करताना गुगल लोकेशनमध्ये नंदनवनच्या विद्यार्थ्यांना तेलंगखेडीच्या शाळा दाखविण्यात येत आहे. नियम जर तीन किलोमीटरचा असेल तर ऑनलाईनमध्ये तीन किलोमिटरच्या आतील शाळा दाखविणे गरजेचे आहे.

Web Title: RTI application for 10 thousand in Nagpur district in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.