विद्यापीठाने २५ महाविद्यालयांची संलग्नता गोठविली; 'येथे' प्रथम वर्षाला प्रवेश न घेण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 01:44 PM2023-06-17T13:44:24+5:302023-06-17T13:46:44+5:30

अकॅडमिक ऑडिट प्रपोजल सादर न केल्याने केली कारवाई

RTM Nagpur University freezes affiliation of 25 colleges; Appeal not to take first year admission in this college | विद्यापीठाने २५ महाविद्यालयांची संलग्नता गोठविली; 'येथे' प्रथम वर्षाला प्रवेश न घेण्याचे आवाहन

विद्यापीठाने २५ महाविद्यालयांची संलग्नता गोठविली; 'येथे' प्रथम वर्षाला प्रवेश न घेण्याचे आवाहन

googlenewsNext

नागपूर : अकॅडमिक ऑडिट प्रपोजल सादर न केल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परिक्षेत्रातील सद्य:स्थितीत २५ महाविद्यालयांची संलग्नता गोठविली आहे. पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेताना या २५ महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज सादर करू नका, असे आवाहन विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

संबंधित २५ महाविद्यालयांच्या नावांची यादी प्रवेश नोंदणी करणाऱ्या वेब पोर्टलवर देण्यात आली आहे. अकॅडमिक ऑडिट प्रपोजल सादर न केल्याने आणखी काही महाविद्यालयांची संलग्नता गोठविली जाऊ शकते. त्यामुळे अशा महाविद्यालयांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय विद्यापीठाची संलग्नता कायम असलेल्या महाविद्यालयांची यादीदेखील विद्यार्थ्यांकरिता त्याच ठिकाणी उपलब्ध करून दिली असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.

संलग्नता गोठवलेली महाविद्यालये

  • कपिलेश्वर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि व्यवस्थापन
  • महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालय
  • नालंदा कला, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालय, भिवापूर
  • सहदेवराव भुते, कला महाविद्यालय
  • श्री. बी.एम. तिडके कॉलेज ऑफ एज्युकेशन
  • श्री राधे महाविद्यालय (सायंकालीन)
  • अशोक मोहरकर कला, वाणिज्य व विद्या महाविद्यालय, पहेला
  • इंदूताई मेमोरिअल बॅचलर ऑफ लायब्ररी अँड माहिती विज्ञान महाविद्यालय
  • श्री. हरिदासन महिला महाविद्यालय
  • गंगाबाई बडोले इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, साओरी
  • किर्सन्स मिशन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानभारती महाविद्यालयात डॉ. ऑफ कॉमर्स, पुलगाव
  • एकवीरा देवी कॉलेज ऑफ एज्युकेशन
  • कै. भय्यासाहेब उरकांडे वरिष्ठ महाविद्यालय
  • बेला महाविद्यालय, बेला
  • ज्युपिटर शारीरिक शिक्षण महाविद्यालय
  • महालक्ष्मी जगदंबा कॉलेज ऑफ लायब्ररी सायन्स
  • पुरुषोत्तम थोटे महाविद्यालय-सिंधूताई सपकाळ महिला महाविद्यालय
  • कै. निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान कॉलेज, मुरमाडी/तुप
  • कै. निर्धनराव पाटील वाघाये कॉलेज ऑफ शिक्षण, तुमसर
  • लक्ष्मीबाई कला व विज्ञान महाविद्यालय, मांगली/खापा.
  • ओॲसिस महाविद्यालय (संध्याकाळ), बेला
  • कै. निर्धन पाटील वाघाये कला व विद्या महाविद्यालय, सौंदड
  • राजीव गांधी सामाजिक कार्य महाविद्यालय
  • रुखमा महिला महाविद्यालय, नवेगाव-बांध

Web Title: RTM Nagpur University freezes affiliation of 25 colleges; Appeal not to take first year admission in this college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.