नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव पुरस्कार ४ सप्टेंबरला, राज्यपाल बैस यांच्या हस्ते होणार वितरण
By आनंद डेकाटे | Published: August 31, 2023 11:22 AM2023-08-31T11:22:54+5:302023-08-31T11:25:13+5:30
४३ मान्यवरांचा होणार गौरव
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शताब्दी महोत्सव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन येत्या ४ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता करण्यात आले आहे. सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित समारंभात विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्याहस्ते पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात येईल.
समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी मंचावर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे उपस्थित राहतील.
राज्यपाल बैस यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार, आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार, डॉ. आर. कृष्णकुमार सुवर्णपदक, प्राचार्य बलराज अहेर स्मृती सुवर्णपदक, शताब्दी महोत्सव सुवर्णपदक, आदर्श अधिकारी पुरस्कार, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार, उत्कृष्ट राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट पुरस्कार, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार, उत्कृष्ट सांस्कृतिक उपक्रमपटू पुरस्कार, उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमपटू पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट संशोधक पुरस्कार, उत्कृष्ट लेखक आदी पुरस्कारांचे वितरण या कार्यक्रमात होणार आहे.
याच कार्यक्रमात विद्यापीठाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास मदत केलेल्या शासकीय अधिकाऱ्यांचा देखील सत्कार केला जाणार आहे. सोबत विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन वार्षिकांक स्पर्धेचे पुरस्कार वितरित केले जातील, अशी माहिती कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी दिली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार
-डॉ. एच.एफ. दागिनावाला, नागपूर
- प्रा. सुरेश देशमुख, वर्धा
- डॉ. निरुपमा देशपांडे, अमरावती
- शिवकिसन अग्रवाल, नागपूर
- हरिश्चंद्र बोरकर, भंडारा
शिक्षण संस्था पुरस्कार
- श्री. नागपूर गुजराती मंडळ, नागपूर.
डॉ. आर. कृष्णकुमार सुवर्णपदक
- डॉ. महेंद्र ढोरे, प्राचार्य, शिवाजी विज्ञान महाविद्यालय, नागपूर
प्राचार्य श्री बलराज अहेर स्मृती सुवर्ण पदक
- प्रदीप बिनीवाले (उपकुलसचिव)
शताब्दी महोत्सव सुवर्ण पदक
- डॉ. नितीन डोंगरवार, विभागप्रमुख
- वसीम अहमद, प्रवीण गोतमारे, राजेंद्र बालपांडे, दर्पण गजभिये
आदर्श अधिकारी पुरस्कार
डॉ. रमण मदने, गणेश कुमकुमवार
आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार
-प्रदीप घ्यार, अरुण हट्टेवार, विलास घोडे, भास्कर शेंडे
उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार
- डॉ. देवेंद्र एस. भोंगाडे, जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम, ता. नरखेड जि. नागपूर
उत्कृष्ट शिक्षक
- डॉ. प्रमोद खेडेकर, औषधी निर्माण शास्त्र विभाग,
- डॉ. ईश्वर के. सोमनाथे, विद्या विकास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समुद्रपूर वर्धा.
उत्कृष्ट संशोधक पुरस्कार
- डॉ. रविन एन. जुगादे, रसायनशास्त्र विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शैक्षणिक विभाग
- डॉ. रतिराम गो. चौधरी, सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज, कामठी जि. नागपूर
उत्कृष्ट लेखक
डॉ. सत्यप्रकाश एम. निकोसे, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार
- विशाल राजकुमार खर्चवाल, शिवाजी सायन्स कॉलेज, नागपूर, अनुष्का नाग हिस्लॉप कॉलेज, नागपूर.
उत्कृष्ट सांस्कृतिक उपक्रमपटू पुरस्कार
- आशुतोष अजय तिवारी, आर. एस. मुंडले धरमपेठ आर्ट्स ॲन्ड कॉमर्स कॉलेज, नागपूर,
- अश्लेशा राजेश खंते, नबिरा महाविद्यालय, काटोल.
उत्कृष्ट राष्ट्रीय छात्रसेना कॅडेट पुरस्कार
- साहिल भीमराव खेलकर, जी. एस. कॉमर्स कॉलेज, वर्धा, आरजू समिर खान पठाण जी. एस. कॉमर्स कॉलेज, वर्धा.
उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमपटू पुरस्कार
मनीष प्रेमलाल कडुकर, (पुरुष प्रवर्ग), विज्ञान संस्था, नागपूर, पृथ्वी अनिल राऊत, (महिला प्रवर्ग), विज्ञान संस्था नागपूर.
शासकीय अधिकाऱ्यांचाही होणार गौरव
- प्रियदर्शनी बोरकर, तत्कालीन तहसीलदार, नागपूर (शहर) व विद्यमान तहसीलदार हिंगणा नागपूर (शहर)
- राजेश आनंदराव देठे, मंडळ अधिकारी, तहसीलदार नागपूर (शहर) कार्यालय
- ॲड. प्रमोद उपाध्याय, विद्यापीठ अधिवक्ता
विद्यापीठ आंतर -महाविद्यालयीन वार्षिकांक स्पर्धा
- लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ - दि क्लाॅक टॉक्स.
- हिस्लाॅप कॉलेज, टेम्पल रोड, सिव्हिल लाईन नागपूर - दी हिस्लोपीएन.
- कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा, नागपूर - कमलगंधा.
- बॅरी. शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय, खापरखेडा जि. नागपूर -कुसुमगंध
- यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लाखांदूर जी. भंडारा - यशवंत.
- गोविंदराम सेकसरिया वाणिज्य महाविद्यालय, वर्धा - अर्थसंदेश
-संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय भुसावळ जी. जळगाव - मानस