नागपूर विद्यापीठाचा दिलासा; परीक्षा हुकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 12:54 PM2022-02-19T12:54:38+5:302022-02-19T13:05:46+5:30

२२ फेब्रुवारी रोजी दोन डझनाहून अधिक अभ्यासक्रमांच्या तृतीय व पाचव्या सत्राच्या ऑनलाइन फेरपरीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे परीक्षा हुकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

rtmnu taking re-examination on feb 22 of the students who missed the exams | नागपूर विद्यापीठाचा दिलासा; परीक्षा हुकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा

नागपूर विद्यापीठाचा दिलासा; परीक्षा हुकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाइन हिवाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परत एक संधी देण्यात येणार आहे. २२ फेब्रुवारी रोजी दोन डझनाहून अधिक अभ्यासक्रमांच्या तृतीय व पाचव्या सत्राच्या ऑनलाइन फेरपरीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे परीक्षा हुकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ऑनलाइन परीक्षेदरम्यान विविध तांत्रिक अडथळ्यांमुळे अनेकांना पेपर देता आले नाही. काहींचे पेपर आपोआपच सबमिट झाले, तर अनेकांचे पेपर योग्य पद्धतीने सबमिटच झाले नाही. शिवाय अनेकांना तर नेटवर्क उपलब्ध नसल्याने पेपरच देता आले नाही. पेपर हुकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी होत होती. अखेर यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी परिपत्रक जारी केले आहे. यानुसार २२ फेब्रुवारी रोजी विविध विषयांच्या परीक्षा घेण्यात येतील. यात बीएस्सी (गृहविज्ञान), एमएफए, एमएड, एमपीएड, एमसीए, एमसीएम या अभ्यासक्रमांचे तृतीय सत्र तर एमएस्सी (अप्लाईड टेक-जीऑलॉजी) च्या पाचव्या सत्र या परीक्षांचा प्रामुख्याने समावेश आहे.

यासंदर्भात विद्यार्थ्यांनी २१ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयात तक्रार दाखल करावी, तसेच प्राचार्यांनी महाविद्यालयाच्या लॉगिनमधून ती तक्रार विद्यापीठाला पाठवावी, तरच विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल, असे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: rtmnu taking re-examination on feb 22 of the students who missed the exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.