आरटीओ : अन् राज्यमंत्री फुके लागले रांगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:27 PM2019-07-08T23:27:31+5:302019-07-08T23:28:14+5:30
राज्यमंत्री असल्याने वरिष्ठांच्या खोलीत बसून सर्व कामे सहज होणे शक्य होते. परंतु आरटीओ कार्यालयात वाहन परवान्याच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम व वने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके सामान्यांसारखे रांगेत लागले. स्मार्ट कार्ड काढण्याचीही प्रक्रिया पूर्ण केली. या घटनेची सोमवारी आरटीओमध्ये दिवसभर चर्चा होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यमंत्री असल्याने वरिष्ठांच्या खोलीत बसून सर्व कामे सहज होणे शक्य होते. परंतु आरटीओ कार्यालयात वाहन परवान्याच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम व वने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके सामान्यांसारखे रांगेत लागले. स्मार्ट कार्ड काढण्याचीही प्रक्रिया पूर्ण केली. या घटनेची सोमवारी आरटीओमध्ये दिवसभर चर्चा होती.
राज्यमंत्री डॉ. फुके सोमवारी दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर, शहर कार्यालयात आले. त्यांनी आधीच आरटीओ अधिकाऱ्यांना सामान्यांसोबत परवान्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याच्या सूचना दिल्या होत्या. यामुळे कार्यालयात आल्यानंतर तळमजल्यावरील परवाना विभागात गेले. परवाना नूतनीकरणाच्या खिडकीवर रांगेत लागून अर्ज सादर केला. ‘स्मार्ट कार्ड’ तयार करण्यासाठी ‘फोटो’ काढत संपूर्ण प्रक्रिया त्यांनी स्वत: पूर्ण केली. यावेळी त्यांच्यासोबत आरटीओचे सहायक परिवहन अधिकारी एम.बी. नेवासकर, परवाना विभागातील प्रमुख एम. एस. संघारे उपस्थित होते. पराग गायकवाड यांनी परवान्याचे नूतनीकरण व ‘स्मार्ट कार्ड’साठी आवश्यक ‘बायोमेट्रिक’ प्रक्रिया पूर्ण केली.