इतर राज्यांतील रेल्वे प्रवाशांसाठी ‘आरटीपीसीआर’ आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:08 AM2021-05-21T04:08:03+5:302021-05-21T04:08:03+5:30
नागपूर : रेल्वेने इतर राज्यांतून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडे कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे आवश्यक आहे. त्याशिवाय महाराष्ट्रात प्रवेश ...
नागपूर : रेल्वेने इतर राज्यांतून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडे कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे आवश्यक आहे. त्याशिवाय महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या १२ मे २०२१ च्या ‘ब्रेक द चेन’ अधिसूचनेनुनासर वाहतुकीच्या कोणत्याही मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल द्यावा लागणार आहे. जो महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी ४८ तास अगोदर केलेला असेल. तसेच १८ एप्रिल २०२१ आणि १ मे २०२१ रोजीच्या आदेशानुसार केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या कोरोना संवेदनशील राज्यांमधून आलेल्या व्यक्तींना लागू करण्यात आलेले सर्व नियम देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या प्रवाशांना लागू करण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.