५०० पोलीस कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:11 AM2021-09-16T04:11:44+5:302021-09-16T04:11:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पुणे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून परतलेले १२ पोलीस कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह आढळून आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुणे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून परतलेले १२ पोलीस कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. खबरदारी म्हणून शहरातील सर्व पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. बुधवारपर्यंत ५०० कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली.
कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार चाचणीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. त्यानुसार मनपाच्या आरोग्य विभागातर्फे मंगळवारपासून पोलीस कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येत आहे. शनिवारपर्यंत ही मोहीम चालणार आहे.
मंगळवारी व बुधवारी या दोन दिवसात मनपाच्या आरोग्य चमूनी पर, कळमना, अंबाझरी, सीताबर्डी, गिट्टीखदान, इमामवाडा, प्रतापनगर, नंदनवन, शांतिनगर, लकडगंज, यशोधरा नगर आदी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांची आरटीपीसीआर चाचणी केली.
मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, डॉ.शुभम मनगटे यांच्यासह झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी ही मोहीम राबवित आहे.