रेल्वे स्थानकावर हमालांची आरटीपीसीआर चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:57+5:302021-06-09T04:08:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर मध्य रेल्वे स्थानकावरील ९० हमालांची मंगळवारी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यासाठी मनपाचे ...

RTPCR test of attackers at railway station | रेल्वे स्थानकावर हमालांची आरटीपीसीआर चाचणी

रेल्वे स्थानकावर हमालांची आरटीपीसीआर चाचणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर मध्य रेल्वे स्थानकावरील ९० हमालांची मंगळवारी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यासाठी मनपाचे मंगळवारी झोन कार्यालय व मध्य रेल्वेच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक कृष्णांत पाटील, विभागीय वाणिज्य प्रबंधक विपुल सुरकार व वसंत पालीवाल, जरिन वर्गीस यांच्या सहकार्याने रेशन सामुग्रीचे वाटप करण्यात आले.

मध्य रेल्वेच्या विभागीय प्रंबंधक रिचा खरे, कृष्णकांत पाटील व मंगळवारी झोनचे सहायक विजय हुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिक उर रहमान खान व मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य प्रबंधक डॉ. विपुल सुरकार यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नागपूर स्थानकावर विविध गाड्यातून उतरणारे १५५ प्रवासी व ९० हमाल अशा एकूण २४५ नागरिकांची चाचणी करण्यात आली.

Web Title: RTPCR test of attackers at railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.