कायद्याचे राज्य..! शासनाच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन करण्याचे धारिष्ट्य करू नये..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 03:49 PM2020-08-14T15:49:57+5:302020-08-14T15:54:08+5:30
संपूर्ण जगासाठी सध्याचा काळ अत्यंत वाईट आहे. कोरोना महामारीच्या संकटाविरोधात सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला तरच या विषाणूवर विजय प्राप्त करणे सोपे आहे, असे नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मिडियावर म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: काळ आणि वेळ कधी सांगून येत नाही. संपूर्ण जगासाठी सध्याचा काळ अत्यंत वाईट आहे. कोरोना महामारीच्या संकटाविरोधात सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला तरच या विषाणूवर विजय प्राप्त करणे सोपे आहे, असे नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मिडियावर म्हटले आहे.
समाजातील सर्वच घटकांनी समाजाप्रती असलेलं देणं फेडण्याची ही वेळ आहे. प्रत्येकाने संवेदना जपण्याची ही वेळ आहे. मात्र या संकटकाळातही लोकांच्या असहायतेचा फायदा घेणे योग्य नाही. नेमकं नागपुरातील रुग्णालयात हा प्रकार होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. रुग्णालयाच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्याकरिता तयार करण्यात आलेल्या समितीने अशा रुग्णालयांना चाप दिला.
अशा काळात नागरिकांच्या गरजेचा जो-जो गैरफायदा घेईल किंवा शाषणाच्या दिशानिदेर्शांचे उल्लंघन करेल अशा सर्व व्यक्ती, संस्था, रुग्णालये आदींविरुद्ध कारवाई सुरू केलेली आहे. ती आता अधिक तीव्र करण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही कायदा आणि शासनाच्या दिशानिदेर्शांचे उल्लंघन करण्याचे धारिष्ट्य करु नये.