देशातील रस्ते व पुलांचे नियम व कोड ठरणार : निर्मलकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 01:05 AM2018-11-22T01:05:41+5:302018-11-22T01:07:02+5:30
देशातील रस्ते व पुलांचे नियम आणि कोड (मानक) तयार करण्याचे काम इंडियन रोड काँग्रेस (आयआरसी) करीत असते. रस्ते व पुलासंदर्भात डिझाईनपासून तर सुरक्षेपर्यंतचे काही कोड आयआरसीने तयार केले असून यापैकी १४ कोड हे नागपुरातील अधिवेशनातच जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच आयआरसीकडे सध्या २५० असे डॉक्युमेंट आहेत. यापैकी १० डॉक्युमेंटवर अधिवेशनात चर्चा करण्यात येणार असून ६ डॉक्युमेंटवर अंमलबजावणीही होईल, अशी माहिती आयआरसीचे सचिव निर्मलकुमार सिंग यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील रस्ते व पुलांचे नियम आणि कोड (मानक) तयार करण्याचे काम इंडियन रोड काँग्रेस (आयआरसी) करीत असते. रस्ते व पुलासंदर्भात डिझाईनपासून तर सुरक्षेपर्यंतचे काही कोड आयआरसीने तयार केले असून यापैकी १४ कोड हे नागपुरातील अधिवेशनातच जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच आयआरसीकडे सध्या २५० असे डॉक्युमेंट आहेत. यापैकी १० डॉक्युमेंटवर अधिवेशनात चर्चा करण्यात येणार असून ६ डॉक्युमेंटवर अंमलबजावणीही होईल, अशी माहिती आयआरसीचे सचिव निर्मलकुमार सिंग यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
या अधिवेशनात रस्त्यांसंदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. यात देशभरासह दहा देशतील तज्ज्ञही सहभागी होणार आहेत. त्यांच्या देशातील रस्ते बांधणीचे निकष व नियम आणि आपल्या देशातील नियम यावर चर्चा होईल, आदानप्रदान होईल. आयआरसी रस्ते बांधणीचे नियम तयार करीत असते. परंतु त्याची अंमलबाजवणी करीत नाही. ते काम संबंधित करणाऱ्या एजन्सीचे आहे. ते काटेकोर होत नाही, अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली.
रोड सेफ्टी आॅडिट - सी.पी. जोशी
देशात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे रस्त्यांची सुरक्षितचा महत्त्वाची आहे. या अधिवेशनात रोड सेफ्टी आॅडिट यावरही चर्चा होणार आहे. याचा अवलंब झाल्यास रस्ते अपघातांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सार्वजनिक बांधक विभागाचे सचिव(रस्ते) सी.पी. जोशी यंनी सांगितले.
हायब्रीड अॅम्युनिटी रोड विदर्भात सुरुवात
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हायब्रीड अॅम्युनिटी रोड तयार करण्याचे आवाहन केले होते. सरकार आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी मिळून तयार केलेला रस्ता म्हणून हायब्रीड अॅम्युनिटी रोड होय. यात ६० टक्के सरकार व ४० टक्के वाटा कॉन्ट्रॅक्टरचा असतो. राज्यात असे १० हजार किमीचे रस्ते बंधण्यात येणार आहे. याची सुरुवात विदर्भातून करण्यात आली आहे. बुलडाणा येथे पहिला १० किमीचा रस्ता तयार केला जात आहे. शेवटचा रोडही विदर्भात होईल असा विश्वासही सी.पी. जोशी यांनी व्यक्त केला. यासोबतच राज्यात ९ हजार किमीचे सिमेंट रस्ते बांधण्यात येणार आहे. गडकरी यांनी यंदा ५ हजार किमीचे टार्गेट दिले आहे मार्चपर्यंत ते पूर्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.