‘धावणार माझी मेट्रो’ विशवॉल मोहिमेला प्रारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:00 PM2018-12-29T23:00:18+5:302018-12-29T23:00:38+5:30

महामेट्रो नागपूरतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘धावणार माझी मेट्रो, विश वॉल’ मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शनिवारी केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी ‘भक्ती’ या निवासस्थाहून नागपूर मेट्रोला ‘विश वॉल’वर लिहून शुभेच्छा दिल्या. नागपूर मेट्रो नागरिकांना नववर्षात नवीन भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

'Run my metro' to start Wish wall campaign | ‘धावणार माझी मेट्रो’ विशवॉल मोहिमेला प्रारंभ 

‘धावणार माझी मेट्रो’ विशवॉल मोहिमेला प्रारंभ 

Next
ठळक मुद्दे नितीन गडकरीसह आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रो नागपूरतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘धावणार माझी मेट्रो, विश वॉल’ मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शनिवारी केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी ‘भक्ती’ या निवासस्थाहून नागपूर मेट्रोला ‘विश वॉल’वर लिहून शुभेच्छा दिल्या. नागपूर मेट्रो नागरिकांना नववर्षात नवीन भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गडकरी यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांना नववर्षात विकास कामांसाठी सदिच्छा दिल्या. त्याचप्रमाणे आयएएस, आयपीएस, डीसीपी अधिकाºयांनीदेखील या मोहिमेचे कौतुक केले आहे. अलीकडेच आयोजित जॉय राईडमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी ‘विश वॉल’वर नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.
नागपूर मेट्रोत प्रवास करण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठी मोठ्या संख्येने नागरिक शुभेच्छा देऊ लागले आहेत. नागरिकांच्या शुभेच्छांच्या आठवणी जपण्यासाठी महामेट्रो नागपूरतर्फे ‘धावणार माझी मेट्रो’, ‘विश वॉल’ची संकल्पना राबविली आहे. ‘धावणार माझी मेट्रो’ या नावाने हॅशटॅग नागपूरकरांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. नागपूर मेट्रोच्या फेसबुक पेजवरही नागरिक उत्स्फूर्त शुभेच्छा देत आहेत. नागरिकांचा उत्साह बघता या शुभेच्छा संकलित करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र लिंक तयार करण्यात आली आहे. शिवाय नागपूर मेट्रोच्या लिंकवर ‘धावणार माझी मेट्रोला’ शुभेच्छा देता येतात.
झिरो माईल्स येथील माहिती केंद्र, लिटिल वूड, मेट्रो हाऊस यासह विविध ठिकाणी महामेट्रोतर्फे ‘विश वॉल’ लावण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर शहरात येणारे कलाकार माहिती केंद्रात येऊन शुभेच्छा ‘विश वॉल’च्या माध्यमातून मेट्रो प्रकल्पाला देत आहेत. या मोहिमेत भाषेचे बंधन नाही. नागरिक आपल्या शब्दात मेट्रो प्रकल्पाला शुभेच्छा देत आहेत. यात लहान मुलांसह, तरुणांचा, महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभाग नोंदवित आहेत. ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. अनेकांनी आपल्या परिसरात ‘विश वॉल’ लावा अशी इच्छा नागरिक महामेट्रोकडे व्यक्त करू लागले आहे. त्यामुळे आता शाळा, महाविद्यालय, खासगी संस्था अशा विविध ठिकाणी ‘विश वॉल’ लावण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे.

Web Title: 'Run my metro' to start Wish wall campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.