ग्रामीण भागात आताही ४२९५ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:08 AM2021-05-27T04:08:19+5:302021-05-27T04:08:19+5:30
सावनेर/काटोल/ कळमेश्वर/ हिंगणा/ उमरेड/रामटेक : नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना साखळी अद्यापही तुटलेली नाही. मंगळवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ५,४५४ चाचण्यांपैकी ...
सावनेर/काटोल/ कळमेश्वर/ हिंगणा/ उमरेड/रामटेक : नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना साखळी अद्यापही तुटलेली नाही. मंगळवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ५,४५४ चाचण्यांपैकी ३४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत १,४१,२२० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील १,३४,२४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २,२७३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ग्रामीण भागात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४,२९५ इतकी आहे.
सावनेर तालुक्यात १८ रुग्णांची भर पडली. यात सावनेर शहरातील तीन तर ग्रामीण भागातील १५ रुग्णांचा समावेश आहे. कळमेश्वर तालुक्यात ११ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिका क्षेत्रात १ तर ग्रामीण भागात १० रुग्णांची नोंद झाली.
काटोल तालुक्यात ३५३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यात ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील ३ तर ग्रामीण भागातील ६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कचारी सावंगा केंद्रांतर्गत एक तर कोंढाळी (३) तर येनवा केंद्रांतर्गत मोडणाऱ्या गावात दोन रुग्णांची नोंद झाली. उमरेड तालुक्यात २४ रुग्णांची भर पडली. यात शहरातील २ तर ग्रामीण भागातील २२ जणांचा समावेश आहे. रामटेक तालुक्यात १२ रुग्णांची नोंद झाली.
हिंगण्यात ग्राफ वाढतोय
हिंगणा तालुक्यात ३० रुग्णांची भर पडली. यात वानाडोंगरी व डिगडोह येथे प्रत्येकी ६ , वडधामना (४), जुनेवानी (३), रायपूर, नीलडोह व हिंगणा येथे प्रत्येकी २ तर इसासनी, मोहगाव, मेटाउमरी, हळदगाव व टाकळघाट येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ११,८०२ इतकी झाली आहे. यातील १०,७८९ कोरोनामुक्त झाले तर २६९ रुग्णांचा मृत्यू झाला.