ग्रामीणमध्ये ५० टक्क्यांपर्यंत गेलाय पॉझिटिव्हचा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:08 AM2021-05-16T04:08:16+5:302021-05-16T04:08:16+5:30

नागपूर : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसते आहे. रुग्णसंख्येची होत असलेली घट शहरासाठी पॉझिटिव्ह आहे. मात्र, ग्रामीण ...

In rural areas, the positive rate has gone up to 50 per cent | ग्रामीणमध्ये ५० टक्क्यांपर्यंत गेलाय पॉझिटिव्हचा दर

ग्रामीणमध्ये ५० टक्क्यांपर्यंत गेलाय पॉझिटिव्हचा दर

googlenewsNext

नागपूर : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसते आहे. रुग्णसंख्येची होत असलेली घट शहरासाठी पॉझिटिव्ह आहे. मात्र, ग्रामीण भागात चाचण्यांच्या तुलनेत निघणारे पॉझिटिव्ह लक्षात घेता पॉझिटिव्हची दर वाढताना दिसतो आहे. मुळात ग्रामीण भागात चाचण्याच कमी होत आहेत. शनिवारी ग्रामीण भागात १,५३० चाचण्या झाल्या आणि ७२४ पॉझिटिव्ह आढळले.

ग्रामीण भागात पॉझिटिव्हचा दर वाढत असल्याने प्रशासनासाठी ही चिंतेची बाब आहे. ग्रामीण भागामध्ये चाचणीच्या किटचा तुटवडा आहे. लोकांची मानसिकताही टेस्ट करण्याची नाही. कोरोनाबाबत लोकही गंभीर नाहीत. त्यामुळे चाचण्या कमी होत आहेत. ग्रामीण भागात गृहविलगीकरणाशिवाय पर्याय नाही. कारण कोविड केअर सेंटरची कमतरता आहे. कोविडवर उपचार करणारी रुग्णालये कमी आहेत. परिस्थिती गंभीर झाल्यास ग्रामीणच्या रुग्णांना शहराशिवाय पर्याय नाही. शहरांमध्ये रुग्ण आल्यानंतर मृत्यूच होत असल्याचा गैरसमज ग्रामीण भागात आहे. त्याचबरोबर लसीकरणाबाबतही ग्रामीण भागात गैरसमज आहे. चाचण्यांबरोबरच लसीकरणाचीही आकडेवारी शहराच्या तुलनेत कमीच आहे.

ग्रामीणमधून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या शहराच्या तुलनेत कमी आहे. शहरातील रुग्णालयामध्येच भरती असलेल्या रुग्णांचीच नोंद प्रशासन घेत आहे; पण ग्रामीणमध्ये घरातही मृत्यू होत आहे. घरी मृत्यू झालेल्यांची कोरोनाची चाचणी केली जात नाही. त्यांची अंत्ययात्रासुद्धा निघत आहे. लोक मास्कचा वापर करीत नाहीत. नियमांचे पालन होत नाही. काही- काही गावांत तर घराघरांत पॉझिटिव्ह असल्याचे सूत्र सांगतात. प्रशासनाने हा अलर्ट लगेच लक्षात न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.

- गेल्या पाच दिवसांतील ग्रामीण भागातील पॉझिटिव्हच्या नोंदी

दिनांक टेस्ट पॉझिटिव्ह मृत्यू

११ मे ४,६९६ ८६६ १९

१२ मे ४,७५१ १,२०० १९

१३ मे ३,८०६ १,०५० २५

१४ मे ३,२६२ ८५१ २२

१५ मे १,५३० ७२४ १४

Web Title: In rural areas, the positive rate has gone up to 50 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.