नागपूर ग्रामीणमध्ये ५० टक्केपर्यंत गेलाय पॉझिटीव्हचा दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 09:03 PM2021-05-15T21:03:24+5:302021-05-15T21:05:24+5:30
In rural Nagpur positive rate has gone up to 50% गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत घट होतांना दिसते आहे. रुग्णसंख्येची होत असलेली घट शहरासाठी पॉझिटीव्ह आहे. मात्र ग्रामीण भागात चाचण्यांच्या तुलनेत निघणारे पॉझिटीव्ह लक्षात घेता पॉझिटीव्हची दर वाढतांना दिसतो आहे. मुळात ग्रामीण भागात चाचण्याच कमी होत आहे. शनिवारी ग्रामीण भागात १५३० चाचण्या झाल्या आणि ७२४ पॉझिटीव्ह आढळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत घट होतांना दिसते आहे. रुग्णसंख्येची होत असलेली घट शहरासाठी पॉझिटीव्ह आहे. मात्र ग्रामीण भागात चाचण्यांच्या तुलनेत निघणारे पॉझिटीव्ह लक्षात घेता पॉझिटीव्हची दर वाढतांना दिसतो आहे. मुळात ग्रामीण भागात चाचण्याच कमी होत आहे. शनिवारी ग्रामीण भागात १५३० चाचण्या झाल्या आणि ७२४ पॉझिटीव्ह आढळले.
ग्रामीण भागात पॉझिटीव्हचा दर वाढत असल्याने प्रशासनासाठी ही चिंतेची बाब आहे. ग्रामीण भागामध्ये चाचणीच्या कीटचा तुटवडा आहे. लोकांची मानसिकताही टेस्ट करण्याची नाही. कोरोनाबाबत लोकही गंभीर नाही. त्यामुळे चाचण्या कमी होत आहे. ग्रामीण भागात गृहविलगीकरणाशिवाय पर्याय नाही. कारण कोविड केअर सेंटरची कमतरता आहे. कोविडवर उपचार करणारी रुग्णालये कमी आहे. परिस्थिती गंभीर झाल्यास ग्रामीणच्या रुग्णांना शहराशिवाय पर्याय नाही. शहरांमध्ये रुग्ण आल्यानंतर मृत्यूच होत असल्याचा गैरसमज ग्रामीण भागात आहे. त्याचबरोबर लसीकरणाबाबतही ग्रामीण भागात गैरसमज आहे. चाचण्यांबरोबरच लसीकरणाचीही आकडेवारी शहराच्या तुलनेत कमीच आहे.
ग्रामीणमधून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या शहराच्या तुलनेत कमी आहे. शहरातील रुग्णालयामध्येच भरती असलेल्या रुग्णांचीच नोंद प्रशासन घेत आहे. पण ग्रामीणमध्ये घरातही मृत्यू होत आहे. घरी मृत्यू झालेल्यांची कोरोनाची चाचणी केली जात नाही. त्यांची अंत्ययात्रा सुद्धा निघत आहे. लोकं मास्कचा वापर फार करीत नाही. नियमांचे पालन होत नाही. काही काही गावात तर घराघरात पॉझिटीव्ह असल्याचे सुत्र सांगतात. प्रशासनाने हा अलर्ट लगेच लक्षात न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.
गेल्या पाच दिवसांतील ग्रामीण भागातील पॉझिटीव्हच्या नोंदी
दिनांक टेस्ट पॉझिटीव्ह मृत्यू
११ मे -४६९६ -८६६- १९
१२ मे -४७५१ -१२००= १९
१३ मे- ३८०६- १०५० -२५
१४ मे -३२६२ -८५१ -२२
१५ मे -१५३० -७२४ -१४