ग्रामीण रुग्णसेवा आॅक्सिजनवर
By admin | Published: December 28, 2014 12:43 AM2014-12-28T00:43:03+5:302014-12-28T00:43:03+5:30
लोकसंख्येचा विचार करता जिल्ह्यात ६४ प्राथमिक अरोग्य केंद्र व ३६६ उपकेंद्र असायला हवीत. परंतु ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३२४ उपकेंद्र कार्यरत असून, ६ आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळाली आहे.
११ प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज : प्रस्ताव अधांतरी
लोकसंख्येचा विचार करता जिल्ह्यात ६४ प्राथमिक अरोग्य केंद्र व ३६६ उपकेंद्र असायला हवीत. परंतु ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३२४ उपकेंद्र कार्यरत असून, ६ आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचा प्रस्ताव अधांतरी आहे.
२० हजार लोकसंख्येमागे प्राथमिक आरोग्य केंद्र तर ५ हजारांहून अधिक लोकसंख्येच्या गावात उपकेंद्र असायला हवे. परंतु ३० हजारांहून अधिक लोकसंख्या असूनही ११ ठिकाणी केंद्र सुरू झालेले नाही. यात दवलामेटी, वाडी, डोंगरगाव, माहुरझरी, खरबी, हुडकेश्वर, गोधनी, रनाळा, नीलडोह, वानाडोंगरी, डिगडोह आदींचा समावेश आहे. तसेच लोकसंख्येचा निकष पूर्ण केल्यानंतरही ५७ उपकेंद्रांना मंजुरी मिळालेली नाही. मात्र काटोल, नरखेड, पारशिवनी, उमरेड, कुही, भिवापूर, मौदा, कळमेश्वर या तालुक्यात अनुशेष नाही.
मागील काही वर्षांत नागपूर शहरालगतच्या भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. परंतु त्यातुलनेत आरोग्य सुविधा उपलब्ध झालेली नाही. नागपूर, कामठी व हिंगणा तालुक्यातील अनुशेष भरून काढण्यासंदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना निवेदन दिले. (प्रतिनिधी)