सदानंद फुलझेले अनंतात विलीन : शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:04 AM2020-03-17T00:04:08+5:302020-03-17T00:05:11+5:30

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्यावर आज सोमवारी अंबाझरी घाटावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.

Sadanan Fulzele merged in Infinite: Funeral in a Bereavement | सदानंद फुलझेले अनंतात विलीन : शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

सदानंद फुलझेले अनंतात विलीन : शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्यावर आज सोमवारी अंबाझरी घाटावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. त्यांची मुले अशोक, आनंद आणि सुधीर यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
यानंतर भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत, महापौर संदीप जोशी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आ. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव, डॉ. भाऊ लोखंडे, रणजित मेश्राम, प्रा. अशोक गोडघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, अ‍ॅड. राजेंद्र पाटील यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली. संचालन दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी केले.
याप्रसंगी भंते नाग दीपांकर, भंते हर्षबोधी, माजी आमदार उपेंद्र शेंडे, एन.आर. सुटे, प्रशांत पवार, तानाजी वनवे, डॉ. राजीव पोतदार, जयदीप कवाडे, भय्याजी खैरकर, ई. झेड. खोब्रागडे, इ. मो. नारनवरे, राजाभाऊ टांकसाळे, डॉ. कृष्णा कांबळे, संजय जीवने, अनिल हिरेखन, स्मिता कांबळे, रवी शेंडे, डॉ. सिद्धार्थ गायकवाड, शिवदास वासे, राजू बहादुरे, बाळू घरडे, वंदना जीवने, भीमराव फुसे, घनश्याम फुसे, सुरेश साखरे, कैलास वारके, नरेश वाहाने, बाबा कोंबाडे, सुनील सारीपुत्त, निळू भगत, प्रमोद रामटेके, मधुकर मेश्राम, देवकुमार रंगारी, राहुल वानखेडे, रमेश पिसे, सच्चिदानंद दारुंडे, माया चौरे, सुरेश घाटे, नितीन गजभिये, राजन वाघमारे, प्रकाश कुंभे, ईश्वर बरडे, अतुल खोब्रागडे, श्वेता गणवीर, इंदू थुल, प्रमोद खांडेकर, मुन्ना नागदिवे, खुशाल लाडे आदींसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आदी विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीक्षाभूमीवरही अनेकांनी घेतले अंत्यदर्शन
दिवंगत सदानंद फुलझेले यांची अंत्ययात्रा दुपारी २.३० वाजता त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानावरून निघाली. ती दीक्षाभूमीवर आली. दिवंगत फुलझेले यांचे पार्थिव पवित्र दीक्षाभूमीवर लोकांच्या दर्शनार्थ ठेवण्यात आले. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आ. जोगेंद्र कवाडे, कमलताई गवई यांच्यासह अनेक मान्यवर व शेकडो लोकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी भदंत सुरेई ससाई व भदंत नाग दीपांकर यांच्या नेतृत्वात भिक्खू संघाने बुद्धवंदना घेतली.

समता सैनिक दलाची मानवंदना
दिवंगत सदानंद फुलझेले यांना समता सैनिक दलातर्फे मानवंदना व निळा सलाम देण्यात आला. भदंत नाग दिपांकर, राजकुमार वंजारी, प्रदीप डोंगरे, रश्मी मोटघरे यांच्या नेतृत्वात समता सैनिक दलाच्या जवानांनी मानवंदना दिली.

Web Title: Sadanan Fulzele merged in Infinite: Funeral in a Bereavement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.