६५ हजार रुपयाचे साेन्याचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:12 AM2021-08-15T04:12:03+5:302021-08-15T04:12:03+5:30

काटाेल : चाेरट्याने घरफाेडी करीत काेठीत ठेवलेले ६५ हजार रुपये किमतीचे साेन्याचे दागिने चाेरून नेले. ही घटना काटाेल शहरातील ...

Saenya's jewelery lamps worth Rs 65,000 | ६५ हजार रुपयाचे साेन्याचे दागिने लंपास

६५ हजार रुपयाचे साेन्याचे दागिने लंपास

Next

काटाेल : चाेरट्याने घरफाेडी करीत काेठीत ठेवलेले ६५ हजार रुपये किमतीचे साेन्याचे दागिने चाेरून नेले. ही घटना काटाेल शहरातील अर्जुनगरात गुरुवारी (दि. १२) दुपारी घडली.

वंदना अनिल उईके, अर्जुननगर, काटाेल या कामानिमित्त बाहेर गेल्या हाेत्या. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील धान्याच्या काेठीत ठेवलेले साेन्याचे दाेन मंगळसूत्र, मणी, डाेरले, कानातील दागिने, साेनसाखळी व जुने दागिने असे एकूण ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. घरी चाेरी झाल्याचे लक्षात येताच वंदना उईके यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस नाईक गाैरव आगरकर करीत आहेत.

Web Title: Saenya's jewelery lamps worth Rs 65,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.