महिलेच्या बॅगमधील साेन्याचे दागिने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:14 AM2021-02-21T04:14:14+5:302021-02-21T04:14:14+5:30

काटाेल : बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगमधील साेन्याचे दागिने चाेरट्याने लंपास केले. त्या दागिन्यांची किंमत १ लाख ५ हजार ...

Saenya's jewelery was snatched from the woman's bag | महिलेच्या बॅगमधील साेन्याचे दागिने पळविले

महिलेच्या बॅगमधील साेन्याचे दागिने पळविले

Next

काटाेल : बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगमधील साेन्याचे दागिने चाेरट्याने लंपास केले. त्या दागिन्यांची किंमत १ लाख ५ हजार रुपये आहे. ही घटना काटाेल बसस्थानक परिसरात गुरुवारी (दि. १८) दुपारी २.४० वाजताच्या सुमारास घडली.

दीपाली गणेश पाचपाेहर (३०, रा. मसाेरा, ता. नरखेड) यांना सिंजर (ता. नरखेड) येथे जायचे हाेते. त्यामुळे त्या काटाेल बसस्थानक येथून बसमध्ये चढल्या. ती बस सिंजरऐवजी कारंजा येथे जात असल्याचे कळताच त्या खाली उतरल्या. त्याचवेळी त्यांच्या बॅगची चेन उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आत ठेवलेले दागिने तपासून बघितले असता, ते गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. चाेरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये ९० हजार रुपयांची साेन्याची पाेत व १५ हजार रुपयांचे साेन्याचे डाेरले व मणी असल्याची माहिती त्यांनी पाेलिसांना दिली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस नाईक सुनील ठाेंबरे करीत आहेत.

Web Title: Saenya's jewelery was snatched from the woman's bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.