साहिल सय्यद पुन्हा पोलीस कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 11:56 PM2020-07-23T23:56:29+5:302020-07-23T23:57:56+5:30

राजकारणाच्या आडून गुन्हेगारी करणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याला गुरुवारी गुन्हे शाखेच्या पथकाने कारागृहातून ताब्यात घेतले. पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात पीसीआर संपल्यामुळे साहिलची कारागृहात रवानगी झाली होती. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे साहिलला आज कारागृहातून ताब्यात घेतले.

Sahil Syed in police custody again | साहिल सय्यद पुन्हा पोलीस कोठडीत

साहिल सय्यद पुन्हा पोलीस कोठडीत

googlenewsNext
ठळक मुद्देबजाजनगरातील गुन्हा : कारागृहातून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजकारणाच्या आडून गुन्हेगारी करणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याला गुरुवारी गुन्हे शाखेच्या पथकाने कारागृहातून ताब्यात घेतले. पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात पीसीआर संपल्यामुळे साहिलची कारागृहात रवानगी झाली होती. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे साहिलला आज कारागृहातून ताब्यात घेतले.
बनसोड नामक निराधार वृद्धाची चार हजार चौरस फुटात सुरेन्द्रनगरमध्ये दुमजली इमारत आहे. सुमारे तीन कोटी रुपये किंमत असलेल्या या इमारतीचे बक्षीसपत्र वृद्ध बनसोड यांनी त्यांची सेवा करणारे (भाडेकरू) डॉ. शशांक चौधरी यांच्या नावे केले होते. आरोपी साहिल सय्यद, संदीप बनसोड आणि गिरीश गिरधर तसेच त्यांच्या साथीदारांनी शशांक चौधरी यांना मारहाण केली. पिस्तुलाच्या धाकावर त्यांचे अपहरण केले आणि त्यांना कोर्टात नेऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने करारपत्र तयार केले. यानंतर त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन पळवून लावले. तेथे आरोपींनी स्वत:चा गार्डही ठेवला. या प्रकरणाची चौधरी यांनी ४ वर्षांपूर्वी बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदविली होती. मात्र, राजकीय पाठबळ वापरून हा गुन्हा दाखल होणार नाही, याची साहिलने काळजी घेतली होती. दरम्यान, साहिलला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केल्याचे कळाल्यानंतर चौधरी यांनी गुन्हे शाखेत येऊन आपली कैफियत ऐकवली. त्यामुळे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी साहिल आणि साथीदारांविरुद्ध बजाजनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी आज अटक केली.

Web Title: Sahil Syed in police custody again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.