वर्षभरापासून संमेलनाध्यक्षपद ‘व्हील चेअर’वरच आहे ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 06:00 AM2021-01-23T06:00:00+5:302021-01-23T06:00:17+5:30

Nagpur news; प्रख्यात कादंबरीकार प्रा.डॉ. रवींद्र शोभणे यांनी फेसबूकवर फिरणारी पोस्ट सध्या साहित्यरसिकांच्या निशाण्यावर आहे. त्याअनुषंगाने त्यांना ट्रोलही केले जात आहे. अनेक जण त्यांच्या मानसिकतेवरही प्रश्न उपस्थित करत आहेत.

Sahitya Samalan; He has been in a wheelchair for a year now. | वर्षभरापासून संमेलनाध्यक्षपद ‘व्हील चेअर’वरच आहे ना!

वर्षभरापासून संमेलनाध्यक्षपद ‘व्हील चेअर’वरच आहे ना!

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘म्हातारा’ हा व्यंग न कळलेले साहित्यिक कसे?

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रख्यात कादंबरीकार प्रा.डॉ. रवींद्र शोभणे यांनी फेसबूकवर फिरणारी पोस्ट सध्या साहित्यरसिकांच्या निशाण्यावर आहे. त्याअनुषंगाने त्यांना ट्रोलही केले जात आहे. अनेक जण त्यांच्या मानसिकतेवरही प्रश्न उपस्थित करत आहेत आणि अनेकांनी संमेलनाध्यक्षपद मिळत नसल्याने हे निराशावादी विचार असल्याची कोपरखळीही मारली आहे. मात्र, शोभणे आपल्या मतावर ठाम आहेत.

गेल्या वर्षभरात संमेलनाध्यक्षपद ‘व्हील चेअर’वरच नाही का, असा प्रतिप्रश्न ते करीत आहेत. ‘अ.भा. म. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ८०, ८५ चा आजारी, म्हातारा, जर्जर झालेला आणि व्हील चेअरवर बसलेला असावा की सर्वत्र फिरणारा, संवाद साधणारा असावा...?’ अशी ही शोभणे यांची पोस्ट आहे. नंतर त्यांनी ‘व्हील चेअर’ हा शब्द गाळून सुधारणा केली आहे. त्याबाबत ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी, आपण आपल्या भुमिकेवर ठाम असून, ‘व्हील चेअर’चा अर्थ लोकांनी दिव्यांगांशी जोडल्याने, तो शब्द गाळल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्या पोस्टमधील म्हातारा, व्हील चेअर हे व्यंगात्मक शब्द ज्यांना कळले नाही, ते साहित्यिक व रसिक कसले, असा प्रतिहल्लाही चढवला आहे.

केवळ व्यक्तिहितासाठी संमेलनाध्यक्षपद असल्याचे गेल्या वर्षभरापासून समजून येत आहे. संमेलनाध्यक्षाकडून संमेलनात उद्घाटनापासून ते समारोपापर्यंत आणि त्यानंतर पुढले संमेलन येईपर्यंत साहित्यविषयक चळवळींमध्ये नेटाने सहभागी होऊन आपले विचार प्रकट करणे, नवोदितांना मार्गदर्शन करणे अपेक्षित असते. मात्र, ९२व्या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दीब्रिटो कुठे आहेत? संमेलनाचे उद्घाटन प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी व्हील चेअरवर केले आणि त्यानंतर अध्यक्षांविनाच संमेलन पार पडले.

वर्षभरही ते कुठेच दिसले नाहीत. असाच अध्यक्ष नारळीकरांच्या रूपाने लादण्याचा अट्टाहास महामंडळ करीत आहे. म्हणजे संमेलनाध्यक्षपद हे आता व्हील चेअरवरच राहणार का, असा शेला शोभणे यांनी मारला आहे. अभिजात भाषा आणि मिळालेल्या निधीचा अहवाल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही प्रमुख मागणी आहे. मात्र, या मागणीच्या अनुषंगाने विद्यमान अध्यक्षांची भूमिकाच कळलेली नाही, शिवाय पुणे येथील पुण्यभूषण संस्था संमेलनाध्यक्षाला पुढील धोरणात्मक कामांसाठी एक लाख रुपये निधी देत असते.

त्या निधीचा उपयोग झाला का आणि झाला असेल, तर त्याचा हिशोब महामंडळाकडे देणे हा नियम असल्याचे डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले. पुढची चार-पाच वर्षे माझी इच्छा नाही अनेक जण संमेलनाध्यक्षपदासाठी मी इच्छुक असल्याचे सांगतात. मात्र, विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीत असल्याने संवैधानिकरीत्या ते अशक्य आहे. निवडणूक होती तेव्हा लढलो. आता चार-पाच वर्षांनंतर बघू असे शोभणे म्हणाले.

Web Title: Sahitya Samalan; He has been in a wheelchair for a year now.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.