साई आस्था फाऊंडेशन, गायत्री परिवार,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:06 AM2021-07-16T04:06:58+5:302021-07-16T04:06:58+5:30

रक्तदान शिबिराद्वारे जपली सामाजिक जबाबदारी नागपूर : साई आस्था फाऊंडेशन, गायत्री परिवार व पोलीस आयुक्तालय यांनी 'लोकमत रक्ताचे नाते' ...

Sai Astha Foundation, Gayatri Parivar, | साई आस्था फाऊंडेशन, गायत्री परिवार,

साई आस्था फाऊंडेशन, गायत्री परिवार,

Next

रक्तदान शिबिराद्वारे जपली सामाजिक जबाबदारी

नागपूर : साई आस्था फाऊंडेशन, गायत्री परिवार व पोलीस आयुक्तालय यांनी 'लोकमत रक्ताचे नाते' या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत गुरुवारी रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक जबाबदारी जपली. त्यांचे रक्तदानातील हे अमूल्य योगदान समाजाकरिता उपयोगी ठरणार आहे.

मानेवाडा-बेसा रोडवरील मीरा मेडिकलच्या परिसरात हे रक्तदान शिबिर झाले. या शिबिरात ३० नागरिकांनी उत्साहात रक्तदान केले. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) सुनील फुलारी, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णात पाटील व गायत्री परिवार नागपूरचे सह-समन्वयक दीपक बिडवे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर या प्रमुख अतिथींनी आपले विचार व्यक्त करताना लोकमत व आयोजक संस्थांचे या अमूल्य सामाजिक याेगदानासाठी अभिनंदन केले. तसेच, या शिबिराच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या रक्तामुळे अनेकांना जीवनदान मिळेल असा विश्वास व्यक्त केला आणि भविष्यातही असेच समाजोपयोगी कार्य करीत राहण्याचे आवाहन केले.

साई आस्था फाऊंडेशन गेल्या आठ वर्षापासून नागपूरसह मेळघाट आणि गोंदिया व गडचिरोली येथील नक्षल परिसरात पोलिसांच्या मदतीने विविध सेवा कार्य करीत आहे अशी माहिती फाऊंडेशनचे संस्थापक आशिष नागपुरे यांनी दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी फाऊंडेशनचे सेवेकरी आरुषी खानविलकर, अक्षता खानविलकर, मोनाली भोयटे, हितेश काटोले, मुकुंद काळमेघ, गायत्री परिवारचे बंडूजी मेश्राम व पोलीस विभागाने अथक प्रयत्न केले.

--------------

यांनी केले रक्तदान

ओ-पॉझिटिव्ह

अभिजित आडेवार, मुकुंद काळमेघ, तुषार हेडाऊ, बंडू मेश्राम, वेदांत गोतमारे, सिद्धेश दांडेकर, हनुमंत दांडेकर, रोशन डोंगरे, मनोरंजन मिश्रा, संजय इमाने, आशिष बाजुलकर, उमेश निनावे, संजय पिसे.

०००

ए-पॉझिटिव्ह

रजत पथराल, राजेश खंडागते, सुनील कोरे, निसर्ग बेलखोडे, अक्षता खानविलकर,

०००

बी-निगेटिव्ह

मानस गहाणे,

०००

बी-पॉझिटिव्ह

प्रथम ठाकरे, सागर बरैय्या,

०००

एबी-पॉझिटिव्ह

निशांत घरपुसे, सत्येंद्र कटरे, विनयचंद्र शिम्पी,

०००

बी-पॉझिटिव्ह

अजय मेहरोत्रा,

Web Title: Sai Astha Foundation, Gayatri Parivar,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.