पोलिस असल्याचे सांगितले, महिलेचे तोंड दाबून दागिने पळविले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 05:32 PM2023-11-11T17:32:00+5:302023-11-11T17:32:33+5:30

कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार

Said to be the police, pressed the woman's face and ran away with the jewellery | पोलिस असल्याचे सांगितले, महिलेचे तोंड दाबून दागिने पळविले

पोलिस असल्याचे सांगितले, महिलेचे तोंड दाबून दागिने पळविले

नागपूर : समोरच्या चौकात खून झाल्याची भीती दाखवून तोतया पोलिसांनी तोंड दाबून एका ज्येष्ठ महिलेचे २.९४ लाखांचे दागिने दिवसाढवळ्या चोरून नेल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

पुष्पा सोहनलाल जैन वय (६४ रा. उंटखाना) असे दागिने चोरी झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. पुष्पा या नेहमीप्रमाणे भोला गणेश चौकातील जैन मंदिरात दर्शनासाठी गेल्या. १०.२० वाजताच्या सुमारास त्या दर्शन घेऊन पायी घरी जात होत्या. खैरे कुणबी समाज भवन समोर मोटारसायकलवर आलेल्या तीघांपैकी एक जण पुष्पा यांच्याकडे आला. ‘हम पुलिसवाले है, आगे सिरसपेठ मे मर्डर हुआ है, अपने जेवर संभाल के रखो’, असे त्याने सांगितले. मी बाजूने जाईल, असे पुष्पा यांनी त्याला सांगितले. नंतर आरोपीने पुष्पा यांचे तोंड दाबून त्यांची सोन्याची चेन, सोन्याच्या बांगड्या आदी दोन लाख ९४ हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून तो साथीदारांसह पसार झाला. पुष्पा यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Said to be the police, pressed the woman's face and ran away with the jewellery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.