‘सजना है मुझे सजना के लिए..’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:11 PM2019-07-08T22:11:08+5:302019-07-08T22:11:50+5:30

सजणे हा युवती, महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. बाहेर पडायचे म्हटलं की तासभरापासून महिलांचे सजणे सुरू होते. आपल्याला चांगला दिसेल असा साजशृंगार करून मगच त्या बाहेर पडतात. स्वरशिल्पने शृंगार हा विषय घेऊन गीतांची मेजवानी रसिक श्रोत्यांना दिली. कार्यक्रमात गायिकांनी शृंगारावरील अप्रतिम गीते सादर करून रसिकांना चिंब केले.

'Sajana Hai Muze Sajana Ke Liye ..' | ‘सजना है मुझे सजना के लिए..’

‘सजना है मुझे सजना के लिए..’

Next
ठळक मुद्देशृंगार गीतांनी रसिक चिंब : ‘नगमे साज शिंगार के’ला प्रतिसाद

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : सजणे हा युवती, महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. बाहेर पडायचे म्हटलं की तासभरापासून महिलांचे सजणे सुरू होते. आपल्याला चांगला दिसेल असा साजशृंगार करून मगच त्या बाहेर पडतात. स्वरशिल्पने शृंगार हा विषय घेऊन गीतांची मेजवानी रसिक श्रोत्यांना दिली. कार्यक्रमात गायिकांनी शृंगारावरील अप्रतिम गीते सादर करून रसिकांना चिंब केले.
स्वरशिल्पच्या वतीने लक्ष्मीनगरच्या सायंटिफिक सभागृहात ‘नगमे साज शिंगार के’ हा गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भाग्यश्री बारस्कर यांच्या ‘ओ घटा सावरी’ या गीताने झाली. त्यानंतर अरुणा मार्कडे यांनी ‘रात का समा’, मृणालिनी भगत यांनी ‘कांटो से खींच के’, विद्या काणे, केतकी दामले यांनी ‘गरजत बरसत’ हे गीत सादर केले. तर ‘सजना है मुझे’ या सुप्रिया फडके यांच्या गीताला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. निहारिका छाजेड यांनी ‘आजा पिया तोहे’, डॉ. संध्या मांजरेकर, भाग्यश्री बारस्कर यांनी ‘जानू जानू रे’, श्वेता देशपांडे यांनी ‘बैया ना धरो’, संध्या पाठक यांनी ‘घडी घडी मोरा’ हे गीत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात त्यानंतर डॉ. सुनिता मोहरीर, पल्लवी उपदेव यांनी ‘कोई आयेगा आयेगा’, रेणुका वेलणकर यांनी ‘मेरी बिंदीया तेरी निंदीया’, मनीषा सावरकर यांनी ‘मेरे हाथो मे नौ नौ’ हे गीत सादर करून रसिकांसमोर अभिनेत्री श्रीदेवी यांच्या स्मृती ताज्या केल्या. कार्यक्रमात अरुणा मार्कंडे, ज्योत्स्ना नगरारे, पौर्णिमा गोखले, विद्या काणे, निहारिका छाजेड, भाग्यश्री बारस्कर, केतकी दामले, डॉ. संध्या मांजरेकर, श्वेता देशपांडे, सुप्रिया फडके, डॉ. सुनिता मोहरीर, संध्या पाठक, ज्योत्स्ना नगरारे, मृणालिनी भगत, मनीषा सावरकर, पल्लवी उपदेव, रेणुका वेलणकर यांंनी अप्रतिम गीते सादर केली. कार्यक्रमाची सांगता भाग्यश्री बारस्कर यांच्या ‘मेरा बाबु छैल छबिला’ या गीताने झाली. संकल्पना भाग्यश्री बारस्कर, संगीत नंदु गोहाणे यांचे होते. कार्यक्रमाचे सुरेख निवेदन श्वेता शेलगावकर यांनी केले. गायक कलावंतांना की बोर्डवर राजा राठोड, तबल्यावर प्रशांत नागमोते, ढोलकीवर अनिकेत दहेकर, ऑक्टोपॅडवर नंदू गोहाणे, गिटारवर रितेश त्रिवेदी यांनी साथसंगत केली.

Web Title: 'Sajana Hai Muze Sajana Ke Liye ..'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.