काेराेनामुक्तीसाठी देवीला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:13 AM2021-05-05T04:13:40+5:302021-05-05T04:13:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : काेराेना संक्रमण दिवसेंदिवस वाढत असून, अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशात शहरातील माता-भगिनी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : काेराेना संक्रमण दिवसेंदिवस वाढत असून, अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशात शहरातील माता-भगिनी काेराेनामुक्तीसाठी देवीपुढे नतमस्तक हाेत आहेत. मातामायला साकडे घालण्यासाठी कलशधारी महिला मंदिरात मनाेभावे पूजाअर्चा करीत आहेत
स्थानिक आझाद चौक येथे मातामायचे मंदिर आहे. शासन-प्रशासन कोरोना संक्रमणामुळे हतबल झाले आहे. दररोज नातेवाईक, परिचित, मित्र मृत्यूच्या दाढेत ओढल्या जात आहे. आरोग्यव्यवस्था कमी पडू लागली आहे. यामुळे महिला,भगिनी आता कोरोनामुक्तीसाठी देवीला साकडे घालत आहेत. दिघोरा, सोनारपुरा, तेलीपुरा आदी परिसरातील महिला सलग नऊ दिवस देवीला साकडे घालणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर मंदिरात फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. मंगळवारी महिलांनी मातामायच्या मंदिरात जाऊन कोरोनामुक्तीसाठी मनोभावे पूजाअर्चा केली. यावेळी कलाबाई नागोशे, वच्छला सहारे, निर्मला सहारे, नर्मदा भजभुजे, उषा राखडे, कल्पना भजभुजे, वनिता भजभुजे, मंदा भजभुजे व मुलींची उपस्थिती हाेती.