सकल मराठा समाज आक्रमक, आरक्षणसाठी मुंडण आंदोलन
By गणेश हुड | Published: November 1, 2023 04:41 PM2023-11-01T16:41:38+5:302023-11-01T16:43:05+5:30
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा
नागपूर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नागपूर शहरात सकल मराठा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गांधी गेट येथे दोन दिवसापासून साखळी उपोषण सुरु आहे. बुधवारी समाजबांधवांनी सरकारच्या विराधाेत मुंडण आंदोलन केले.
उपोषणकर्त्यांत सकल मराठा समाजाचे राजे संग्रामसिंग भोसले, शारदाताई गावंडे, राजेश निंबाळकर, अनुप थोरात, अशोक अंबर्ते, विजय शिंदे, अमोल माने आदींचा समावेश आहे. यावेळी समाजाचे डॉ. मुधोजी राजे भोसले, शिरीष राजे शिर्के, मनोज साबळे, मिलिंद साबळे, स्वप्निल काळे, जितेंद्र खोत, सचिन लिमसे, मनोहर गावंडे, प्रकाश खंडागडे, विक्रम वाघ, प्रकाशराव जाधव, विजय भोसले, , अविनाश घोगले, अक्षय वाकडे, गौरव होणे, अनुप थोरात, प्रशात निकम, प्रजय जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
यापूर्वी मराठा समाजाने विश्वविक्रमी ५८ मोर्चे शांततेच्या मार्गाने काढलेले होते, त्याप्रमाणेच नागपुरातील हे आंदोलनसुद्धा शांततेच्या मार्गाने सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. अशी मागणी आंदोलकांनी केली.