जबरानजोतधारकांची जगण्याची लढाई

By admin | Published: October 31, 2015 03:30 AM2015-10-31T03:30:13+5:302015-10-31T03:30:13+5:30

जबरानजोतधारकांनी शासकीय जमिनींवर कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. या गरीब लोकांकडील जमिनी त्यांच्या जगण्याचे साधन आहेत.

For the sake of survival of the stakeholders | जबरानजोतधारकांची जगण्याची लढाई

जबरानजोतधारकांची जगण्याची लढाई

Next

जमीन अधिकार परिषद : विजय पंड्या यांचे प्रतिपादन
नागपूर : जबरानजोतधारकांनी शासकीय जमिनींवर कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. या गरीब लोकांकडील जमिनी त्यांच्या जगण्याचे साधन आहेत. परंतु आज सरकारकडून त्या जमिनींना धोका निर्माण झाला आहे. त्या सर्व जमिनी परत घेण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे. हा केवळ जमिनीचा संघर्ष नसून जगण्याची लढाई असल्याचे प्रतिपादन विजय पांड्या यांनी केले.
कष्टकरी जन आंदोलन समितीतर्फे शुक्रवारी जबरानजोतधारकांची जमीन अधिकार परिषद आयोजित करण्यात आली होती. धरमपेठ येथील सर्वोदय आश्रम येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून माजी आमदार वामनराव चटप, अरुण केदार, प्रवीण मोते, रेखा पवार, कष्टकरी जन आंदोलनाचे संयोजक विलास भोंगाडे, वसंतराव वाघमारे व दिनेश म्हरसकोल्हे उपस्थित होते. या परिषदेत विदर्भातील शेकडो जबरानजोतधारकांनी भाग घेतला होता. पांड्या पुढे म्हणाले, ही लढाई फार मोठी आहे. त्यामुळे धरणे, आंदोलन व मोर्चांसह आपल्या ताब्यात असलेल्या जमिनीवर कायदेशीर हक्क कसा मिळविता येईल, याचाही विचार करावा, असे त्यांनी आवाहन केले. सरकार जबरानजोतधारकांच्याविरुद्ध असले, तरी प्रत्येक गावातील ग्रामसभा मात्र आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आम्हाला कुणीही हटवू शकत नाही आणि उठवूही शकत नाही, असे त्यांनी सांगितले. वामनराव चटप यांनी सरकारने जबरानजोतधारकांना मालकी पट्टे देण्यासोबतच त्यांना भूस्वामी सुद्धा बनविले पाहिजे, अशी मागणी केली. जबरानजोतधारक हा जमिनीचा मालक झाल्याशिवाय त्याला कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.
शिवाय कर्जही दिले जात नसल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरू वातीला विलास भोंगाडे यांनी प्रास्ताविकातून परिषदेची संक्षिप्त माहिती दिली. संचालन एकनाथ गजभिये यांनी केले. समीक्षा गणवीर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)

Web Title: For the sake of survival of the stakeholders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.