सखी महोत्सव २७ रोजी
By admin | Published: April 25, 2017 02:21 AM2017-04-25T02:21:51+5:302017-04-25T02:21:51+5:30
लोकमत सखी मंच स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले एक असे व्यासपीठ ज्या व्यासपीठावरून आज ती मुक्तपणे बागडू लागली आहे.
विविध स्पर्धांची धूम : लोकमत सखी मंच व भोजवानी फूडस् यांचे संयुक्त आयोजन, सोबत इन्शुरन्सविषयी मार्गदर्शन
नागपूर : लोकमत सखी मंच स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले एक असे व्यासपीठ ज्या व्यासपीठावरून आज ती मुक्तपणे बागडू लागली आहे. आत्मविश्वासाच्या पंखावर कर्तव्याचे ओझे सांभाळत मुक्तपणे झेप घेऊ लागली आहे. या व्यासपीठावरून फक्त शहर विभागातील महिलाच नाही तर ग्रामीण भागातील महिलासुद्धा गगनभरारी घेऊ लागल्या आहेत. त्यांच्यातील कलेला, प्रतिभेला वाव देण्यासाठी पुन्हा एकदा जिल्हास्तरीय ‘सखी महोत्सव-२०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. कलाविष्काराचा हा अभूतपूर्व सोहळा ठरणार आहे.
लोकमत सखी मंच व भोजवानी फूडस् आयोजित ‘बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स सखी महोत्सव-२०१७’ म्हणजे विविध स्पर्धांनी नटलेला उत्सव. यात एकल नृत्य स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा आणि समूह नृत्य स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यकम सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात २७ एप्रिल रोजी ११ ते ३ यादरम्यान आयोजित केला आहे. या कार्यक्रमात सखींच्या कलाविष्काराच्या मुक्त उधळणासोबतच विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मिळणार आहे. केवळ मनोरंजनावरच भर देण्यात आला नसून, स्त्रियांचे आर्थिक नियोजनदेखील व्यवस्थितरीत्या व्हावे यासाठी खासकरून महिलांसाठी बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सच्यावतीने ‘स्वाभिमान’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. त्यात कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त कसे मिळवावे, यासंदर्भात बिर्ला सनलाईट इन्शुरन्सचे प्रतिनिधी मार्गदर्शन करतील.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून उपस्थित राहणाऱ्या महिलांसाठी खास भाग्यवंत सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये आकर्षक पुरस्कार जिंकण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, आज सोमवारी या महोत्सवाची प्राथमिक फेरी लोकमत भवनाच्या ११ व्या माळ्यावर पार पडली. परीक्षक म्हणून डेनिस पास्कल व प्रियल शहा उपस्थित होते. या महोत्सवाला ‘अॅटिट्यूड डिझाईन्स बाय दिशा’याचे विशेष सहकार्य मिळाले आहे.
या आगळ्यावेगळ्या सखी महोत्सवात सर्व सखी मंच सदस्य परिवरासहित सादर आमंत्रित आहे. अधिक माहितीसाठी नेहा जोशी यांना ९८५०३०४०३७ वर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)
वैशाली सामंत यांच्या गीतांचा कार्यक्रम
‘कोंबडी पळाली’ फेम वैशाली सामंत यांच्या या गीताने साऱ्या जगाला वेड लावले. सखी महोत्सवात अशा अनेक धडाकेबाज गीतांची प्रस्तुती त्या करणार आहेत. तसेच सखींशी दिलखुलास गप्पा मारणार आहेत. याशिवाय या कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुका सखी मंच सदस्य सहभागी होणार असून, त्यांचा कलाविष्कार रसिकांना बघायला मिळणार आहे.