लसीकरण न केलेल्या शिक्षकांचे थांबतील वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:17 AM2021-09-02T04:17:46+5:302021-09-02T04:17:46+5:30

नागपूर : भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी २३ ऑगस्ट रोजी एक पत्र काढले. या पत्रात ज्या शिक्षक, शिक्षकेतर ...

Salary of unvaccinated teachers will stop | लसीकरण न केलेल्या शिक्षकांचे थांबतील वेतन

लसीकरण न केलेल्या शिक्षकांचे थांबतील वेतन

Next

नागपूर : भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी २३ ऑगस्ट रोजी एक पत्र काढले. या पत्रात ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली नसेल त्या कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन थांबविण्यात येईल. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या पत्रामुळे शिक्षकांमध्ये खळबळ आहे.

भंडारा येथील शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रासंदर्भात प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाच्या कार्याध्यक्षांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली असून, वेतन थांबविण्याची धमकी देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष हेमंत गांजरे यांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे १० एप्रिल २०२१ चे पत्र असून, त्यात लस घेणे पूर्णपणे ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले आहे. १० ऑगस्ट २०२१ चा शालेय शिक्षण विभागाचा शाळा सुरू करण्यासंदर्भात आदेश आला होता, तो काही कारणास्तव स्थगित केला. त्यातसुद्धा शिक्षकांना लस घेणे आवश्यक केले होते, पण बंधनकारक केले नाही. शिक्षणाधिकाऱ्यांच्या या पत्रामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम पसरत आहे. शासनाने लसीकरण बंधनकारक असल्याचे आदेश अजूनही काढलेले नाही. त्यामुळे शिक्षणाधिकारी कुठल्याही अधिकारांतर्गत शिक्षकांचे वेतन थांबवू शकत नाही, असे गांजरे यांचे म्हणणे आहे.

Web Title: Salary of unvaccinated teachers will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.