शटर अर्धवट ठेवून विक्री; १५ दुकानावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:06 AM2021-04-16T04:06:59+5:302021-04-16T04:06:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संचारबंदीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही शहरातील काही भागात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संचारबंदीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही शहरातील काही भागात कापड विक्री, इलेक्ट्राॅनिक वस्तू, सौंदर्य प्रसाधने यासह अन्य काही दुकाने सुरू होती. अशा १५ दुकानांवर गुरुवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकांनी कारवाई करून १ लाख ४५ हजाराचा दंड वसूल केला.
नागपूर जिल्ह्यात दररोज सहा ते सात हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. संक्रमण वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश मनपा प्रशासनाने जारी केले आहे. असे असतानाही काही दुकानदारांनी अर्धे शटर खाली करून विक्री सुरू ठेवल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
लक्ष्मीनगर झोन पथकाने छत्रपती चौकातील आर्टिफास्ट प्रोजेक्ट लि.ला १५ हजाराचा दंड केला. धरपमेठच्या पथकाने लक्ष्मीभवन चौकातील अजंता स्टोअर्सला ५ हजार, धंतोली येथील के. असोसिएटला ५ हजार, हनुमाननगर झोन पथकाने मानेवाडा रोडवरील विठ्ठलकृपा रेडिमेड ५ हजार, रघुकुल ५ हजार, गांधीबाग झोनच्या पथकाने भावसार चौकातील आराधना साडी सेंटरला १० हजार, त्रिवेणी साडी सेंटरला २० हजार, परिवार मॅचिंग सेंटरला २० हजार, लव्हली नक्सला १० हजारांचा दंड केला. सतरंजीपुरा झोन पथकाने जय वैष्णवी कलेक्शनला १० हजार, लकडगंज पथकाने रामकृष्ण स्टीलला १० हजार, मंगळवारी झोनच्या पथकाने पीबीएम पोलिटेक्सला १५ हजार, आर.एस. ऑटोमोबाईलला ५ हजार, मिनरल ट्री एक्सट्रा ५ हजार, टी.एम. फिदा अली अॅन्ड सन्स ५ हजार अशाप्रकारे दंड वसूल करण्यात आला.
...
झोन प्रतिष्ठानांची तपासणी दंड
लक्ष्मीनगर ४ १५०००
धरमपेठ ७ १००००
हनुमाननगर २ १००००
धंतोली ४ ००
नेहरूनगर ४ ००
गांधीबाग ५ ६००००
सतरंजीपुरा २ १००००
लकडगंज १५ १००००
आसीनगर १२ ००
मंगळवारी ४ ३००००
एकूण ५९ १४५०००