नागपुरात ड्रग्जची विक्री सुरूच, तरुणाकडून १.६० लाखांची ‘एमडी पावडर’ जप्त

By योगेश पांडे | Published: August 3, 2023 03:39 PM2023-08-03T15:39:28+5:302023-08-03T15:40:36+5:30

आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

Sale of drugs continues in Nagpur, 'MD powder' worth 1.60 lakhs seized from youth | नागपुरात ड्रग्जची विक्री सुरूच, तरुणाकडून १.६० लाखांची ‘एमडी पावडर’ जप्त

नागपुरात ड्रग्जची विक्री सुरूच, तरुणाकडून १.६० लाखांची ‘एमडी पावडर’ जप्त

googlenewsNext

नागपूर : हसनबाग परिसरात एका तरुणाकडून पोलिसांनी १.६० लाखांची ‘एमडी पावडर’ जप्त केली आहे. नंदनवन पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली.

जमाल खान रियाज मोहम्मद खान (३८, हसनबाग) असे आरोपीचे नाव आहे. पहाटेच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करत असताना उस्मानिया मशीदीजवळच्या मार्गावर जमाल खान हा संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला. पोलिसांनी त्याला अडवून त्याची झडती घेतली असता प्लॅस्टिकच्या लहान पिशवीत १६ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. या पावडरची किंमत १.६० लाख रुपये आहे. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्याच्याकडून महागडा फोन व कारदेखील जप्त करण्यात आली. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर सादर केले व त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याकडे ‘एमडी पावडर’ नेमकी कुठून आली व त्याचा पुरवठादार कोण आहे याची पोलीस चौकशी करीत आहेत.

Web Title: Sale of drugs continues in Nagpur, 'MD powder' worth 1.60 lakhs seized from youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.