बनावट कागदपत्राद्वारे भूखंडांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:11 AM2021-08-23T04:11:55+5:302021-08-23T04:11:55+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : शेतमालक बाहेरगावी राहत असल्याचा फायदा घेत चाैघांनी शेतीचे बनावट कागदपत्र तयार केले. त्या शेतात ...

Sale of plots through forged documents | बनावट कागदपत्राद्वारे भूखंडांची विक्री

बनावट कागदपत्राद्वारे भूखंडांची विक्री

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : शेतमालक बाहेरगावी राहत असल्याचा फायदा घेत चाैघांनी शेतीचे बनावट कागदपत्र तयार केले. त्या शेतात लेआऊट तयार करून ‘एनए’ नसताना भूखंडांची परस्पर विक्री केेल्याचा प्रकार भिवापूर शहरात उघड झाला आहे. यात संबंधितांनी ७२ भूखंडांची विक्री करीत १ काेटी ८० लाख रुपयांनी फसवणूक केल्याची माहिती ठाणेदार महेश भाेरटेकर यांनी दिली.

आराेपींमध्ये माेहम्मद ताेहीद हनिफ जादा, रा. वडसा देसाईगंज, जिल्हा गडचिराेली, मिर्झा नदीम शमीन बेग, ईरशाद चांद शेख, दाेघेही रा. भिवापूर यांच्यासह एका डाक्यूमेंट रायटरचा समावेश आहे. शिवरामा माेहनराव सत्यनारायण उर्मी (वय ७१, रा. नांदुरा, जिल्हा बुलडाणा) यांची भिवापूर शहरापासून एक किमीवर शेती आहे. या चाैघांनी संगनमत करून यातील एक शेतमालक असल्याचे भासविले आणि त्या शेतावर लेआऊट तयार केले. त्यासाठी खाेटी कागदपत्रेही तयार केली.

त्यांनी ‘एनए’ (नाॅन ॲग्रीकल्चर-अकृषक) नसलेल्या या लेआऊटमधील ७२ भूखंडांची नागरिकांना परस्पर विक्री करून १ काेटी ८० लाख रुपये कमावले. हा प्रकार उघड हाेताच शिवरामा माेहनराव सत्यनारायण उर्मी यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी भादंवि ४२०, ४२६, ४४७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक शरद भस्मे करीत आहेत.

...

शेताच्या विक्रीचा साैदा फिसकटला

माेहनराव मिरचीचे व्यापारी असून, त्यांची भिवापूर शहरातील ऑफिसर काॅलनीत २.१६ हेक्टर आर जमीन आहे. त्यांनी या जमीन विक्रीचा माेहम्मद ताेहीद हनिफ जादा याच्याशी जानेवारी २०१९ मध्ये २ काेटी ९४ लाख रुपयांत साैदा केला. करारनाम्याप्रमाणे ऑक्टाेबर २०१९ मध्ये या जमिनीची विक्री करावयाची हाेती. करार करतेवेळी एक काेटी रुपये देण्यात आले हाेते. नियाेजित काळात विक्री न झाल्याने हा साैदा फिसकटला हाेता. त्यातच ताेहीद हनिफ जादा याने त्या जमिनीवर अनधिकृत लेआऊट तयार करून भूखंड विक्री केली आणि प्रकरण उघड झाले.

220821\207-img-20210822-wa0099.jpg

सदर लेआऊटवर मुळ शेतमालकाने लावलेला फलक

Web Title: Sale of plots through forged documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.