पीओपी बाप्पाची विक्री... चोरी-चोरी चुपके चुपके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:13 AM2021-09-05T04:13:47+5:302021-09-05T04:13:47+5:30
- गाइड लाइन्स आल्यावरही कारवाईला होतोय उशीर; गणेशोत्सवासाठी ठिकठिकाणी सजली दुकाने आकांक्षा कनोजिया लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गणेशोत्सवाच्या ...
- गाइड लाइन्स आल्यावरही कारवाईला होतोय उशीर; गणेशोत्सवासाठी ठिकठिकाणी सजली दुकाने
आकांक्षा कनोजिया
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात गणेशमूर्तींच्या विक्रीची दुकाने सजली आहेत. या दुकानांत मातीच्या मूर्तीसोबतच निर्बंध असलेल्या पीओपी मूर्तींचीही विक्री केली जात आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पीओपी मूर्ती विक्रीला ठेवता येत असली तरी त्याचे विसर्जन करता येणार नाही. त्यातच मनपाच्या निर्देशानुसार पीओपी मूर्तींच्या विक्रीवर बंदी आहे. मात्र, याकडे मूर्ती विक्रेत्यांनी सारासार दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. ‘लोकमत’च्या चमूने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली आहे.
----------
ही आहे वास्तविकता....
केस १ - मेडिकल चौक
रिपोर्टर : मातीची मूर्ती काही वेळाने तडकत असल्याने, मला पीओपीची मूर्ती हवी आहे
दुकानदार : आमच्याकडे केवळ मातीच्या मूर्तीच आहेत.
रिपाेर्टर : ठीक आहे. मी दुसरीकडे बघते. (निघत असतानाच)
दुकानदार : मॅडम पीओपी मूर्ती मिळेल. कारवाईच्या भीतीने आम्ही त्या मूर्ती दुकानात ठेवत नाही.
रिपाेर्टर : मग, त्या मूर्ती कुठे ठेवता?
दुकानदार : घरी किंवा दुकानात लपवून ठेवतो.
रिपाेर्टर : दाखवा.. मला डेकोरेटेड मूर्ती हवी आहे.
दुकानदार : आता केवळ पाच-सहाच मूर्ती आहेत. पसंत पडल्या नाही तर उद्या या. आणखी मागवून ठेवतो.
-------------
केस २ - सीताबर्डी
रिपोर्टर : गणेशमूर्तीची ऑर्डर द्यायची आहे.
दुकानदार : पसंत करून घ्या. गणेश चतुर्थीच्या दिवशी डेकोरेट करून मिळेल.
रिपोर्टर : मूर्तींचे रेंज काय आहे?
दुकानदार : पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंत मिळेल. मातीचीच हवी आहे ना?
रिपोर्टर : नाही, पीओपीची हवी आहे. मातीच्या मूर्तीला पाणी लागले की खराब होण्याची भीती असते.
दुकानदार : मिळेल. किती मोठी हवी आहे.
रिपोर्टर : तुम्ही दाखवा, मी पसंत करते.
दुकानदार : या एवढ्याच ठेवल्या आहेत. आणखी यायच्या आहेत. या मूर्ती विकण्यावर बंदी आहे. परंतु, आता आल्या आहेत तर विकल्या जात नाहीत. आमचे मोठे नुकसान होईल.
रिपोर्टर : ठीक आहे, मला या मूर्ती आवडल्या नाहीत. मी उद्या येते. आवडली नाही तर आजची हीच फायनल करते.
-------------