पीओपी बाप्पाची विक्री... चोरी-चोरी चुपके चुपके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:13 AM2021-09-05T04:13:49+5:302021-09-05T04:13:49+5:30
सीताबर्डी, मेडिकल चौक, धरमपेठ, गिट्टीखदान, जरीपटका, गड्डीगोदाम, सदर, रामदासपेठ आदी भागात सर्वात जास्त पीओपी मूर्ती चोरी चोरी चुपके चुपके ...
सीताबर्डी, मेडिकल चौक, धरमपेठ, गिट्टीखदान, जरीपटका, गड्डीगोदाम, सदर, रामदासपेठ आदी भागात सर्वात जास्त पीओपी मूर्ती चोरी चोरी चुपके चुपके विकल्या जात आहेत.
-----------
मूर्ती विकण्यासाठीचे नियम
मूर्ती विक्रीसाठी एक महिन्यापूर्वीच मनपामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. विना नोंदणी विक्री केली तर संबंधित दुकानदारावर दंडात्मक कारवाई होईल. पीओपी मूर्तींची विक्री केली तर मनपाद्वारे सर्व मूर्ती जप्त केल्या जातील. मूर्ती विकण्यासाठी २०० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येत आहे.
-------
‘उडान पथक’ करेल कारवाई
उडान पथकात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी, महानगर पालिकेचे अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते सहभागी आहेत. हे पथक मूर्तींची तपासणी करतील आणि नियमाबाहेर आढळल्यास संबंधित दुकानावर कारवाई केली जाईल, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितली.
------------
उच्च न्यायालयाचे आदेश येण्यापूर्वीच अनेकांनी पीओपी मूर्ती मागवून घेतल्या आहेत. मात्र, पर्यावरण संरक्षणाच्या हेतूने मनपाने या मूर्तींच्या विक्रीवर प्रतिबंध घातले आहे. अशा स्थितीत मनपाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पीओपी मूर्ती पर्यावरणासाठी धोकादायक आहेत. या मूर्तींचे विसर्जन केल्यास, तलाव, नदी आणि विहिरीचे पाणी प्रदूषित होईल.
- डॉ. मोटघरे, सह संचालक, महाराष्ट्र पर्यावरण मंडळ
-------------
सर्व स्वयंसेवी संस्था मिळून गणेशोत्सवात पर्यावरणाबाबत जनजागृती करत आहेत. उत्सवादरम्यान नदी, तलावांत घाण पसरू नये, ही काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच गणेशोत्सव, दुर्गापूजा आदींच्या वेळी काळजी घेतली जाते.
- कौस्तुभ चॅटर्जी, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन
.........................