नागपूर शहरात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:26 PM2020-05-04T22:26:50+5:302020-05-04T22:29:31+5:30

लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या नागरिकांना समाजसेवकांच्या वतीने प्लास्टिक पिशव्यांमध्ये रेशन व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले जात आहे. काही व्यापारी त्याचा फायदा घेऊन प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री करीत आहेत.

Sale of Prohibited Plastic Bags in Nagpur City | नागपूर शहरात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री

नागपूर शहरात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री

Next
ठळक मुद्देमनपाची कारवाई निष्प्रभ : व्यापारी बिनधास्त करताहेत व्यवसाय

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या नागरिकांना समाजसेवकांच्या वतीने प्लास्टिक पिशव्यांमध्ये रेशन व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले जात आहे. काही व्यापारी त्याचा फायदा घेऊन प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री करीत आहेत. एका व्यापाऱ्याने तर महानगरपालिके कडून दोन दिवस दुकान सुरू ठेवण्याची रीतसर परवानगी घेऊन प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विकल्या. त्याची माहिती मिळाल्यानंतर मनपाच्या एनडीएस सेलने व्यापाºयाला रंगेहात पकडले. त्यानंतरही इतवारीमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री सुरू आहे.
लॉकडाऊन लागू झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते गरजवंतांना प्लास्टिक पिशव्यांमधून जीवनावश्यक वस्तू वितरित करीत आहेत. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांची मागणी वाढली. व्यापारी या सामाजिक भावनेचा फायदा घेऊन सरकारने प्रतिबंधित केलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करीत आहेत. गरजवंतांना मिळत असलेली मदत लक्षात घेता पोलीस व मनपाने ही बाब गंभीरतेने घेतली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी संधीचा लाभ घेण्यासाठी दुप्पट किमतीमध्ये प्लास्टिक पिशव्या विकल्या. गेल्या दीड महिन्यापासून हा अवैध प्रकार सुरू होता. ही बाब प्लास्टिक पिशव्यांचा व्यापारी पारस जैनवरील कारवाईने प्रकाशात आली. जैनने त्याच्या संबंधांचा उपयोग करून मनपाकडून दोन दिवस दुकान सुरू ठेवण्याची परवानगी घेतली होती. त्याचे दुकान सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिक अचंबित झाले. त्यांनी मनपाकडे तक्रार केली. नागरिकांकडून जैनची पार्श्वभूमी माहिती झाल्यानंतर मनपा अधिकारी सतर्क झाले. दरम्यान, जैन दोन दिवस संपल्यावरही लपून प्लास्टिक पिशव्या विकत असल्याची माहिती अधिकाºयांना मिळाली. त्यानंतर त्यांनी जैनच्या घरून प्लास्टिक पिशव्या घेऊन जात असलेल्या ग्राहकाला पकडले. तसेच, जैनच्या घराची झडती घेऊन २०० किलो खर्रा पन्नी जप्त केल्या. परिणामी, जैन व इतर व्यापाºयांनी दोन-चार दिवसाकरिता प्लास्टिक पिशव्या विकणे बंद केले. परंतु, आता पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. प्लास्टिक पिशव्यांसाठी मनमानी किंमत घेतली जात आहे. मनपा अधिकारी व पोलीस कोरोना संक्रमण रोखण्यात व्यस्त असल्याचा व्यापारी फायदा घेत आहेत.

Web Title: Sale of Prohibited Plastic Bags in Nagpur City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.