लाॅकडाऊनकाळातही खर्राविक्री सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:09 AM2021-04-23T04:09:54+5:302021-04-23T04:09:54+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : राज्य शासनाने काेराेना संक्रमण राेखण्यासाठी लाॅकडाऊनची घाेषणा केली असली, तरी माैदा शहरात खर्राविक्री जाेरात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : राज्य शासनाने काेराेना संक्रमण राेखण्यासाठी लाॅकडाऊनची घाेषणा केली असली, तरी माैदा शहरात खर्राविक्री जाेरात सुरू आहे. ही खर्राविक्री चाेरूनलपून हाेत असल्याने त्याच्या किमतीत वाढ झाली आहे. शाैकिन चढ्या दराने खर्राखरेदी करीत असून, खर्रा खाणारे कुठेही उघड्यावर थुंकत असल्याने हा प्रकार काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडण्याची व त्यातून धाेका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लाॅकडाऊनमुळे सुपारीच्या व सुगंधित तंबाखूच्या किमतीत वाढ झाल्याने खर्राच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत, अशी माहिती काही खर्राविक्रेत्यांनी दिली. दुसरीकडे, या किमती दुपटीने वाढल्याची माहिती खर्रा खाणाऱ्यांनी दिली. बहुतांश तरुण खर्रा खाऊन मनात येईल तिथे थुंकतात. यात काेण काेराेना संक्रमित आहे आणि काेण नाही, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे काेराेना पाॅझिटिव्ह व्यक्तींच्या थुंकीद्वारे काेराेनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खर्रा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य किराणा साहित्यासाेबत माैदा शहरात पाठविले जाते. लाॅकडाऊनमुळे त्या साहित्याच्या वाहतूक खर्चात वाढ झाल्याची माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली. वास्तवात, माैदा शहरातील बहुतांश दुकाने बंद असतानाही शाैकिनांना सहज खर्रा उपलब्ध हाेताे. त्यामुळे खर्राविक्रीची दुकाने शाेधून विक्रेत्यांवर कारवाई करणे प्रशासनासाठी डाेकेदुखी ठरत आहे.