नागपुरात  सॅनिटायझरची दारू म्हणून विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 10:45 PM2020-04-18T22:45:17+5:302020-04-18T22:46:33+5:30

सॅनिटायझरची दारू म्हणून विक्री करणाऱ्या कुणाल संजय बैसवारे नामक आरोपीला सदर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सॅनिटायझरच्या १८० एमएलच्या २९ बॉटल्स जप्त करण्यात आल्या.

Sales of sanitizer as liquor in Nagpur | नागपुरात  सॅनिटायझरची दारू म्हणून विक्री

नागपुरात  सॅनिटायझरची दारू म्हणून विक्री

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपी गजाआड : सदर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सॅनिटायझरची दारू म्हणून विक्री करणाऱ्या कुणाल संजय बैसवारे नामक आरोपीला सदर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सॅनिटायझरच्या १८० एमएलच्या २९ बॉटल्स जप्त करण्यात आल्या.
नागपुरातील वर्धमाननगरातील एका मद्य बनविणाºया कंपनीने रॉयल अल्कोहल नावाने सॅनिटायझरची निर्मिती करून ते सॅनिटायझर दारूच्या बॉटल्सयध्ये भरले. या बॉटल्स बाजारपेठेत विकायला आल्या आहेत. सॅनिटायझरला दारू आहे, असे म्हणत काही जणांनी त्याचा विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. आरोपी कुणाल बैसवारे यानेही सदर भागात तळीरामांना ही दारू आहे असे म्हणून या बॉटल्स विकणे सुरू केले. त्याची माहिती कळताच सदरचे ठाणेदार महेश बनसोडे, सहायक पोलीस निरीक्षक विलास माटे, अजय गर्जे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी रात्री कुणाल बैसवारेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सॅनिटायझरच्या २९ बॉटल्स जप्त करण्यात आल्या. या कारवाईची माहिती पोलिसांनी अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या पथकाला दिली. त्यांनी हे जप्त केलेल्या सॅनिटायझरचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविले. आरोपी कुणाल बैसवारे याच्याविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाचे निनाद लांडे यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, सॅनिटायझर निर्माण करणाºया वर्धमाननगरातील जयस्वाल यांच्या कारखान्यात रॉयल अल्कोहल नावाने सॅनिटायझर निर्माण करून ते चक्क दारूच्या बॉटल्समध्ये भरले आणि बाजारपेठेत विकायला पाठविले. त्यामुळे मद्यपींच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. ही माहिती कळल्यानंतर प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली असून, कंपनीला हा माल विकण्यास प्रतिबंध केला आहे तसेच २५ लाखाचा मालही जप्त करण्यात आला आहे. मात्र ज्यांनी दारूच्या बॉटल्समधील सॅनिटायझर विकत घेतले त्यांनी त्याचा मोठा साठा करून तळीरामांना दारू म्हणून विकणे सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात चौथ्यानंदा असा प्रकार उघडकीस आला आहे. यापूर्वी शांतिनगर, नंदनवन तसेच वर्धमाननगरातही अशा घटना उघडकीस आल्या आहेत.

Web Title: Sales of sanitizer as liquor in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.