महिला बचत गटाच्या वस्तू विक्रीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:08 AM2021-06-26T04:08:27+5:302021-06-26T04:08:27+5:30
काेंढाळी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत काटाेल शहरातील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात महिला बचत गटाच्या सदस्यांनी तयार केलेल्या ...
काेंढाळी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत काटाेल शहरातील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात महिला बचत गटाच्या सदस्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीला सुरुवात करण्यात आली. या स्टाॅलवर कुकडीपांजरा (ता. काटाेल) येथील भवानी महिला स्वयंसाहाय्यता समूह व राधा महिला बचतगटाच्या सदस्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
शुभारंभप्रसंगी पंचायत समिती सभापती धम्मपाल खोब्रागडे, उपसभापती अनुराधा खराडे, खंडविकास अधिकारी संजय पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक प्रफुल्ल तायवाडे, समन्वयक रोशन मेश्राम, स्वप्नील मेहतकर, शुद्धाेधन गराडकर, उपजीविका सखी प्रवीणा वानखेडे, वनिता पाटील, लता शेंडे, सीआरपी रिना गोलाईत यांच्यासह बचत गटाच्या सदस्य उपस्थित हाेत्या. या स्टाॅलवर महिला बचतगटाच्या सदस्यांनी तयार केलेले मिरची पावडर, हळद पावडर, मसाले, पापड, कुरड्या, वड्या, लोणचे, डाळ आदी खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.