नागपुरात इंदिरा गांधी यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 11:20 PM2018-11-19T23:20:46+5:302018-11-19T23:23:50+5:30
माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शासकीय कार्यालयांसह विविध संघटनांतर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शासकीय कार्यालयांसह विविध संघटनांतर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली.
विभागीय आयुक्त कार्यालय
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ घेतली. यावेळी उपायुक्त सुधाकर तेलंग, संजय धिवरे, के.एन.के. राव, सहायक आयुक्त मनिषा जायभाये तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, सुजाता गंधे, राजलक्ष्मी शहा, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनीही गुलाबपुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महावितरण
माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फे आदरांजली वाहण्यात आली. काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, महाव्यस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता हरीश गजबे, नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवार, सहायक महाव्यस्थापक (मा.स.) वैभव थोरात, व्यस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे आदींसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस सेवादल
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस सेवादलने त्यांना आदरांजली अर्पण केली. सेवादलचे सचिव मीरसाहब सोहेब अली प्रमुख अतिथी होते. रामगोविंद खोब्रागडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मो. कलाम, डॉ. प्रकाश ढगे, डॉ. अनिल वाघ, डॉ. रमजान अन्सारी, पंकज पांडे, देवेश गायधने, प्रशांत रिनके, मच्छिंद्र जीवने, प्रमोद रामटेके, अरुण अनासाने, प्रकाश कुंटे, दशरथ ताकोदे आदींनी आदरांजली अर्पण केली.
पश्चिम नागपूर झोपडा सुधार समिती
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पश्चिम नागपूर झोपडा सुधार समितीतर्फे राजीव गांधी औद्योगिक केंद्र गांधीनगर येथे आदरांजली अर्पण करण्यात आली. सुंदरलाल बनवारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात राजा कुरवते, मधुकर पोपळघट, रोहीत लिल्हारे, विजय कार्लेकर, महादेवराव चौधरी, कैलास कनोजिया, नितीन श्रीबांसरे, सुरेश भलावी, राजा तुमडाम, पापा गजक, अतुल घोम, पंकज सलामे, राजेश बनवारी, हिना मंदवार, कल्पना लिल्हारे, सुनिता चौधरी, माया राऊत आदी उपस्थित होते.
दक्षिण नागपूर
दक्षिण नागपूरच्यावतीने नवीन सुभेदार, राजा मारोती गार्डन परिसरात इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संध्या ठाकरे, रमेश गिरडकर, राजेश बेलखोडे, चक्रधारी दुरुगकर, रमेश काकडे, बबनराव डेकाटे, चरणदास सोमकुंवर, आशा कुर्वे, डॉ. पुष्पा दुरुगकर, रंजना विरुळकर, धनश्री बावणे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.