मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील शहिदांना अभिवादन

By आनंद डेकाटे | Published: August 4, 2023 02:03 PM2023-08-04T14:03:32+5:302023-08-04T14:05:29+5:30

मराठवाडा विद्यापीठ नामांतर शहीद दिन

Salutations to the Martyrs of the Marathwada University Name Change Movement | मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील शहिदांना अभिवादन

मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील शहिदांना अभिवादन

googlenewsNext

नागपूरडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर शहीद दिनानिमित्त शुक्रवारी इंदोरा १० नंबर पूल येथील नामांतर शहीद स्मारकावर विविध संघटनांनी संस्थांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद भीमसैनिकांना अभिवादन केले.

सहयोग मित्र परिवार संस्था, उत्तर नागपूर विकास आघाडी, समता सैनिक दल व उत्तर नागपूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संयुक्त विद्यमाने रिपाइं नेते डी.एम. बेलेकर, भदंत नागदीपांकर, अमर दीपांकर, रामभाऊ डोंगरे, नामांतर चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते अनिल वासनिक यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना विनम्र अभिवादन केले. 

याप्रसंगी समता सैनिक दलाचे अमर दीपांकर, खुशाल लाडे, पुष्पाताई घोडके, लहानू बन्सोड, रमेश ढवळे, ओमप्रकाश मोटघरे, राजकुमार वंजारी, सी.टी, मेश्राम, राजकुमार मेश्राम, वसंत गेडामकर, अरुण गायकवाड, सुनिता ढवळे,अनिल बावनगडे,पद्मा अलोने, नरेश महाजन, नरेंद्र रामटेके, लीलाधर मेश्राम, ललिता चव्हाण, प्रभा बन्सोड, वर्षा सहारे, अर्चना लाडे, दीप्ती नाईक, डाली सरदारे, तारा बन्सोड, प्रेमफुला उके, सुरेश वंजारी, रजनी वंजारी, वनमाला लोखंडे, शीतल पानतावणे, शालिनी पानतावणे, राजन टेंभुर्णे, अनिल मेश्राम, धम्मा मेश्राम, कमलेश सहारे, युवराज बडगे, अश्विन पिल्लेवान, सुबोध सरदारे, सुमेध ढवळे, सिद्धार्थ जवादे, तुलाराम मेश्राम, विवेक निमगडे, प्रेम टेंभुर्णे, विलास पाटील, अशोक राऊत, अशोक शेंडे, अनिल रंगारी, इंदू मेश्राम, शीला डोंगरे, शीला ढोणे, धनराज रंगारी, रमेश रामटेके, तुलसीदास मेश्राम, लोकमत ढोणे यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Salutations to the Martyrs of the Marathwada University Name Change Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.