कोरोना वॉरियर्सच्या कर्तृत्वाला सलाम; इंडियन एअरफोर्सने बॅन्डमधून भरला जोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 09:18 PM2020-05-03T21:18:20+5:302020-05-03T21:19:14+5:30

मेडिकलमधील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन कोरोना विषाणूशी निगडित प्रत्येकाला अहोरात्र सेवा देण्याचे कार्य करीत आहे. खऱ्या अर्थाने ते ‘कोरोना वॉरियर्स’ ठरले आहेत. त्यांच्या या कर्तृत्वाला ‘इंडियन एअरफोर्स’ने सलाम केला आहे.

Salute to the accomplishments of the Corona Warriors; The Indian Air Force filled Josh from the band | कोरोना वॉरियर्सच्या कर्तृत्वाला सलाम; इंडियन एअरफोर्सने बॅन्डमधून भरला जोश

कोरोना वॉरियर्सच्या कर्तृत्वाला सलाम; इंडियन एअरफोर्सने बॅन्डमधून भरला जोश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मेडिकलमधील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन कोरोना विषाणूशी निगडित प्रत्येकाला अहोरात्र सेवा देण्याचे कार्य करीत आहे. खऱ्या अर्थाने ते ‘कोरोना वॉरियर्स’ ठरले आहेत. त्यांच्या या कर्तृत्वाला ‘इंडियन एअरफोर्स’ने सलाम केला आहे. आपल्या ‘बॅन्ड’च्या माध्यमातून त्यांनी ‘कोरोना वॉरियर्स’मध्ये जोशही भरला.
नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या १५१ वर पोहचली आहे. यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले काही डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांवर क्वॉरंटाईन होण्याची वेळ आली आहे. जे कोविड वॉर्डात सेवा देत आहेत ते स्वत:हून घरातील लोकांपासून दूर राहत आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांची चिंता आहे. घरून निघताना काळजी घेण्याचे सल्ला दिले जातात. बाहेर पडत असताना मोठ्यांच्या, चिमुकल्यांच्या डोळ्यातील च्ािंता बरेच काही सांगून जाते. परंतु कोरोना विरोधातील लढाईतील हे योद्धे रुग्णालयात आल्यावर सर्वकाही विसरून रुग्णसेवा देत आहेत. याची दखल ‘इंडियन एअरफोर्स’ने घेतली. रविवारी सकाळी मेडिकल परिसरात आपल्या बॅन्डवर शौर्यगीत वाजवून ‘वॉरियर्स’च्या कर्तृत्वाला सलाम केला. यावेळी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, कोविडचे नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद फैजल, डॉ. मुकुंद देशपांडे, डॉ. कांचन वानखेडे, कोविड हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. पवित्र पटनाईक, डॉ. सोनुने, मेट्रन मालती डोंगरे व मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. मुकुल देशपांडे आदी उपस्थित होते.

उत्तर महाराष्ट्र व गुजरात उपक्षेत्राकडून कोरोना वॉरियर्सचा सन्मान
मुख्यालय उत्तर महाराष्ट्र व गुजरात उपक्षेत्राकडून मेयो, मेडिकलमधील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी या ‘कोरोना वॉरियर्स’चा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मुख्यालयाकडून सर्वांना मिठाई वितरित करण्यात आली. मेजर जनरल राजेश कुंद्रा यांनी रुग्णसेवा देणाºया प्रत्येकाचे कौतुक केले. या लढाईत आम्ही तुमच्यासोबत असल्याचेही ते म्हणाले.

 

Web Title: Salute to the accomplishments of the Corona Warriors; The Indian Air Force filled Josh from the band

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.