डॉक्टरांच्या कर्तृत्वाला सलाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:04+5:302021-07-02T04:08:04+5:30
वानाडोंगरी : उमंग फाैंडेशनच्यावतीने डाॅक्टर्स-डे च्या निमित्ताने हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कामगारांचा शाल आणि श्रीफळ ...
वानाडोंगरी : उमंग फाैंडेशनच्यावतीने डाॅक्टर्स-डे च्या निमित्ताने हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कामगारांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या महामारीने अख्खे जग हादरून गेलेले आहे. या संकटाच्या काळात डॉक्टर्स मोलाची भूमिका बजावत सहकाऱ्यांच्या मदतीने रुग्णांची निरंतर सेवा करीत आहेत. अशा ४२ सत्कारमूर्तींचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. सामाजिक बांधिलकी व शासकीय नियमांचे पालन करीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत घोडेराव, तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, फाैंडेशनचे अध्यक्ष मनोज झाडे, कार्याध्यक्ष पंकज गजबे आणि सचिव रवींद्र कुंभारे उपस्थित होते.
सर्व कोरोना वॉरियर्सना मानाचा मुजरा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन फौंडेशनचे अध्यक्ष मनोज झाडे यांनी केले. संचालन रवींद्र कुंभारे यांनी केले.